Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

उघडीले मन सद्गुरुंनी !

उघडीले मन सद्गुरुंनी !

श्री समर्थ मालिक – मनमिळाऊपणा – भाग एक

मनमिळावू म्हणजे काय? मन हे केवढे आहे? किती मोठे, किती बारीक आहे? पकडले तर सापडते कां? मन कोठून व कोणापासून आहे? मन म्हणजे काय? ते दिसते काय?

मन म्हणजेच माया ! माया दिसते कां? दिसे ते मायावी कसे? तत्व जे असे ते अविनाशी ! माया हि दिसते कां? तसेच मन हे दिसत नाही. आता, मन म्हणजे काय? तर हे येणारे मायावीचे तरंग ! हे दिसत नाहीत. मन हे सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म असून, ते अति वेगवान आहे. ते कवटाळता येत नाही.

मन हे कोणापासून? तर मजपासोनी असे म्हटले आहे नाही कां? मज काय आहे, काय नाही? येथील आसनाचे सेवेकरी आहेत, ते मनमिळावूपणाने अभिन्नत्वाने चालले आहेत कां? तर हे जे आहे, ते जडत्वाच्या चोचल्यांमुळे आहे. ही प्रकृती अनेक रुपाने नटलेली आहे. प्रकृती अंगाने सेवेकरी पाहतात, म्हणून मनाचे तरंग विखुरतात. प्रकृती अंगाने पाहिले नाही तर ते मन अनंत तऱ्हेने धावेल का? तर हे एकाच गतीने, एकाच ठिकाणी कसे गुंतवता येईल, तर आपणाला महान तत्व बहाल केलेले आहे. त्यात सेवेकरी रममाण झाल्यानंतर त्याला दुमत भासेल कां? तर नाही. अशा तऱ्हेने सेवेकऱ्यांनी चालले पाहिजे. ©️

You cannot copy content of this page