Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

मी दूर जाणार नाही…©️

मी दूर जाणार नाही…©️

श्री समर्थ मालिक – सत् संपत्ती दिसत नाही. दृश्य संपत्तीला मानव मोहवून होतो. तो मोह असावा, पण कसा पाहिजे? शुद्ध आणि सात्विक मोह असेल तर अघोर संपत्तीच्या मागे मानव लागणार नाही. दृश्य संपत्तीपेक्षा सत् संपत्ती श्रेष्ठ आहे.

मी कोणाला शरण आहे? कोणावाचून काय घडते, धनसंपत्ती कोठून मिळते? ही खूण सापडली तर मोहवश होणार नाही. पण हि जर मेख सापडली नाही तर तो मोहवश होतो.

बाबा – दृश्य संपत्ती कोणा पासून मिळते?

मालिक – सांगतो. सत् कुठे आहे?

बाबा – सत् हे पंचमहाभूतांच्या कवचात आहे.

मालिक – म्हणजे ते हृदयात आहे. हृदयात असल्यानंतर काय करतात?

बाबा – नामस्मरण !

मालिक – आणखी काय करतात?

बाबा – सर्वस्व कार्य करतात. काम करतात. पगार घेतात.

मालिक – कशामुळे?

बाबा – सत् आहे त्यामुळे.

मालिक – सेवेकरी म्हणतो, मी कमवतो. मी करतो. मग कोणाच्या सत्तेने कमावतो? कोणाला वाहतो? अन् हीच ती गुढ अविद्या माया होय. हा जो पडदा टाकला त्या भ्रमंतीमध्येच मानव गुरफटून गेला आहे. दृश्य मायेला लंपट होऊन, माझे माझे म्हणत आहे व अदृश्या पासून दूर होत आहे. मात्र हि मेख ज्यांनी ओळखली, त्यांना त्याचे शुभही नाही आणि अशुभही नाही. ते आदेशाप्रमाणे फक्त कर्तव्य करीतच राहणार. बाकी उचापती करीत नाहीत.

या दरबारातील सेवेकरी ज्ञानी पण आहेत अन् अज्ञानी पण आहेत. ज्ञान देण्यासाठी आसनावरून प्रवचने होत असतात. हे ज्ञानच आहे. ते घेतल्यानंतर प्रश्न उत्तरे पण करतात. बोलणे सोपे असते. परंतु कृतीमान झालेला सेवेकरी दिसतो आहे का? तो मायेच्या व्यापातून निष्काम आहे, असे म्हणू का मी? मग जे गुढ आहे, ते त्याला कळणार नाही. या भानगडीत पडू नये. विचारले ते सांगितले, त्याप्रमाणे प्रयत्नशील असावयास पाहिजे. परब्रम्ह तत्व जरी असले, तरी सेवेकरी माझ्यावर व मी सेवेकऱ्यांवर अवलंबून आहे. सेवेकऱ्यांनी मला जवळ घेतले पाहिजे. असे जर केले तर त्याला दूर लोटता येणार नाही. मी दूर जाणार नाही. (समाप्त)©️

You cannot copy content of this page