Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

भक्तीचा जिव्हाळा ©️

भक्तीचा जिव्हाळा ©️

श्री समर्थ मालिक – ज्या ठिकाणी पाण्याचा जिव्हाळा आहे, त्या ठिकाणी खोदण्याची आवश्यकता असते काय? आपोआपच पाणी दिसते. ज्याने भक्तीचा जिव्हाळा जाणला आहे, त्याला ती आपोआपच मिळते. पण जिव्हाळा मागून मिळत नसतो. मागितला तरी मिळणार नाही. तर तो कर्मसंचिताप्रमाणे मिळतो. ज्याने भक्तीचा जिव्हाळा जाणला, तोच दैवाचा पुतळा आहे. ते बोल कोणी फेकले? ते बोल चुकीचे आहेत का?

ज्याने हा भक्तीचा जिव्हाळा जाणला त्याला कुठेही जाण्याची, भटकण्याची आवश्यकता नाही. मग तो जंगलात, अरण्यात बसतो कां? ज्यांना साधन साधावयाचे, नाव कमवायचे ते जंगलात, गुहेत जाऊन बसतात. केवळ साधन साधण्यासाठी ते जात असतात.

परमेश्वर पाहण्यासाठी ऋध्दी सिद्धी, तंत्र मंत्राची आवश्यकता नाही. ज्याने वेदांचा मुख्य पिताच हाताशी धरला,‌ त्याला इतरांची आवश्यकता काय? म्हणून ज्यांना मी सापडलो, ज्यांनी माझी ओळख करून घेतली, त्यालाच हे वर्म समजले आहे. ज्याला प्रणवाची गोडी आहे, तो कान भरून ऐकू शकतो. तोच मानव सत् मार्गाने, सत् भक्तीने जाण्याचा प्रयत्न करतो. इतरांना गोडी नसते.

अनेक तऱ्हेने अनेक रूपाने ही प्रकृती नटलेली आहे. अनंत तऱ्हेचे मानव अनंत चवीने नटलेले आहेत. तेथे सताचा काय दोष आहे? हा सर्व मायेचा बाजार आहे. हे मायेचे कर्तव्य आहे. मला जर काही करावयाचे असेल तर लाघव तऱ्हेने सूत्र फिरवित असतो. पण सद्गुरूंचे आपल्या सेवेकऱ्याकडे लक्ष असतेच ! (समाप्त) ©️

You cannot copy content of this page