Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

सेवा, आरती, सेवेकरी ©️

सेवा, आरती, सेवेकरी ©️

जी अखंड सेवा आसनावरून दिली, तो अखंड ध्वनी आसनी-शयनी, भोजनी, तसेच सर्व कर्तव्यात सारखा चालू राहील, मग त्या सेवेकऱ्याचे भलेबुरे पहाणारे कोण? तर तेच ! मी नव्हे ! ज्याला तुम्ही शरण आहात ते !

आरती म्हणजे काय? हे सेवेकर्‍याला कळले आहे का? आरती, अनंत भूजा ! विठो पंढरी राजा !! आरती या तीन अक्षरांचा अर्थ काय? आरती म्हणजे काय? अनंत पूजा म्हणजे काय? विठो म्हणजे काय? अशी ज्या सेवेकऱ्याने आरती केली, तो सद्गुरु चरणात, सद्गुरु भक्तीत किती रममाण झाला असला पाहिजे? आरती आहे की नाही? कोण आरती करून घेतो? हे तरी त्याला समजेल का? असा रममाण असल्यावर, तो कधी घरीदारी फिरेल का?

सेवेकरी दरबारात आल्यानंतर चित्त देऊन ऐकतात. दरबाराच्या खाली उतरल्यानंतर त्यांचे लक्ष दाही दिशा फिरते. कानांची श्रवणी दाही दिशा असते. तरी पण या आसनाचे सेवेकरी, जे या ठिकाणी येत आहेत, ते अत्यंत भाग्यवान आहेत. कारण ही गती, हे सानिध्य मिळणे फारच कठीण आहे. अजूनही सेवेकरी येणार आहेत. आलेले काही बाहेर गेले आहेत. ते निराळे आहेत. सद्गुरु हसतील, बोलतील, सर्वस्व करतील, पण गुह्य खुण जाणने फार दुरापास्त आहे. ती सेवेकर्‍यांनी जाणली की अंत लावला असे म्हणता येईल. जोपर्यंत आसनाचा सेवेकरी झाला नाही, रित, गती काहीएक माहिती नाही, तोपर्यंत त्याला बोलता येत नाही. पण सेवेकरी झाल्यानंतर त्याला बोलणे आवश्यक आहे. त्या सेवेकर्‍याला अनुभव मिळाल्यानंतर, माझे आणि तुझे असे म्हणता येईल का? ©️

You cannot copy content of this page