Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

सर्वांगीण सद्गुरु सेवा ©️

सर्वांगीण सद्गुरु सेवा ©️

श्री समर्थ मालिक – सर्वांगीण सद्गुरु सेवा – सर्वांगीण सद्गुरु सेवा करणारा सेवेकरी आहे का? सर्वांगीण सद्गुरु सेवा करतो म्हणजे तो सेवेकरी कसा असतो? तो निष्कांचन असून, त्याचे ठिकाणी पूर्णत्व वैराग्य वृत्ती असते. हे सर्वस्व माऊलींचे असून माझे काहीही नाही अशी पूर्णत्वाने त्याची वृत्ती असते. ज्या वेळेला शरण, त्याच वेळेला त्याने आपले तन-मन-धन सर्वस्व सद्गुरू चरणांवर वाहिले आहे.

आपण त्या अनंतांचे सेवेकरी असून, अनंत कणातला शेवटच्या पायरीचा एक कण आहोत, अशा स्थितीने मनाची चंचलता न ठेवता स्थिर राहून त्यात डुंबून राहिले पाहिजे. सेवेकरी १७ व्या जीवनकळेचे पाणी पीत राहिला, तर सर्वांगीण सेवा होते. मात्र १७ वी जीवन कळा अखंड सुटली आहे, पण त्याचे पाणी प्यायला की नाही हे मला सांगता येत नाही. प्यायलेला असेल तर त्याने स्पष्टीकरण करणे.

सद्गुरु चरणात निमग्न झालेली ज्योत असे म्हणेल का? माझ्याकडे लक्ष टाका, माझ्या मुलाकडे पहा, बायको भांडते आहे, हे सांगणे आसनाजवळ येत असते. सर्व सेवेकऱ्यांचे येत असते. मग तू सेवेकरी सर्वांगीण सद्गुरु सेवेत निमग्न झाला आहे असे म्हणता येईल का? ©️

You cannot copy content of this page