Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

शुभ संदेश – ©️

शुभ संदेश – ©️

स्थूल जडत्वाला काय होईल आणि काय नाही याचा नेम नाही. जडत्वाला व्याप झाले तर मानव कासावीस होतो आणि अशाच वेळेला त्याला परमेश्वराची आठवण होते. जडत्वाच्या पाठीमागे व्याप लागल्यानंतरच मानव देवाचे नाव घेतो. देवाचे ध्यान करतो. अखेर ईश्वरा जवळ शांती मिळविण्यासाठी ओरडतो. पण खरोखर जडत्व जे आहे ते वर्षाचे १२ महिने सुखी असेल का? आणि शांततेत सुरुवाती पासून जडत्व राहील का? सुखी जडत्व राहण्यासाठी अहर्निश ध्यानात, नामात निमग्न राहिले पाहिजे. मग जडत्वाला त्रास होईल का? आणि अशाप्रकारे निमग्न झाला तर त्याला सुख आणि दुःख समान वाटते.

शुभ संदेश – नाम हेच श्रेष्ठ आहे. नामातीत, नामात सद्गुरु आहेत. आपण मानव जन्मात आहात. स्थूलात असेपर्यंत प्रत्यक्ष दर्शन घेणे. कर्तव्याप्रमाणे चालणे. नाम श्रेष्ठ आहे. महान सत्पुरुष नामानेच झाले. जिथे सत नाही असे ठिकाण आहे का? एकच संदेश, मानवात असल्यानंतर काहीना वाटते नामस्मरणास वेळ नाही. पण नामस्मरण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मला केलेच पाहिजे. दोन मिनिटे का होईना मी कर्तव्याचे पालन करीन. 

मी-तू, द्वेष भावना न ठेवणे. आपण एकच आहोत जन्माला घालणारा एकच व अंती नेणारा एकच, हि ठाम श्रद्धा ठेवणे. आपण ज्यावेळी शुद्धीकरण घ्याल त्यावेळी प्रथम संदेश विश्व नंतर सर्वस्व कर्तव्य ! ©️

You cannot copy content of this page