समर्थ – सेवेकरी ज्यावेळेस अखंड सेवेला पात्र होतो, त्यावेळेला सेवेकरी आणि सद्गुरू तत्व निराळे नाही. गोवर्धन चैतन्यमय होण्याची स्थिती आहे. सर्वस्व चैतन्यमय आहे. अफाट भक्ती आहे. सत् आचरण आहे. त्या युगामध्ये त्यांच्यामुळे फार मोठे कार्य झाले आहे. मात्र जे संचिताप्रमाणे कर्म भोगावयाचे ते भोगू दिले आहे. एवढी महान भक्ती, एवढी महान शक्ती असताना सुद्धा किती लिनता !
सद्गुरु चरणाची सेवा म्हणजे सत् सेवा होय. यांची सेवा करण्याची इच्छा असली तरी, पूर्णत्व देण्याकरीता अखंड समाधीत राहणे योग्य होय. ज्यावेळेला राक्षसांनी हल्ला केला, त्यावेळेला नामापासून थोडी सुद्धा ढळलेली नाही. ज्यावेळेला आपला अखंड दरबार आहे, त्यावेळेला त्यांना दर्शनाला बोलावणे.
गोवर्धन ऋषी – जो तेजोमय चैतन्याचा गाभा, तो आज पूर्णत्वाने मिळाला. आतापर्यंतची कृती, कर्तव्य, त्याचे फळ प्रत्यक्ष अनुभवायास मिळाले. ध्यानस्थ स्थितीत संकट ओढवले असताना, त्याची यत्किंचितही जाणीव न देता, त्याच स्थितीत ठेवले.
कोणते असे तत्व श्रेष्ठ होते की, त्या तत्वासाठी अहोरात्र टाहो फोडीत होतो, ते मिळाले नाही. परंतु आज प्रत्यक्षात मिळाले. सद्गुरु नाम आणि ध्यान याच्या निराळे काही नाही. किती अफाट शक्ती आहे की, एवढे भयंकर संकट ओढवले असताना अजिबात जाणीव होऊ दिली नाही. कोणत्या निद्रेत होतो ते कळलं नाही. त्याची जागृती आज पूर्णत्वाने आली, मिळाली.
तेजोमय वलयरुपी चैतन्याचा अखंड लाभ व्हावा, ही आशा आहे. ज्या परब्रह्म शक्तीसाठी आजपर्यंत टाहो फोडला, ते अखंड दर्शन आज मिळाले. हेच अखंड मिळावे ही इच्छा आहे आणि दरबारची सेवा करण्याची इच्छा आहे. ज्या तऱ्हेची सेवा द्याल, त्या तऱ्हेची सेवा करण्याची इच्छा आहे. (समाप्त) ©️