अलख – कृती तसे फळ ! झाले ते योग्यच आहे. दोन वेळेला आदेश मान्य केले नाहीत. त्याला गेल्या दरबारात गुप्त आदेश दिले होते. त्याप्रमाणे त्याच्या सांगण्यावरून आदेश दिले होते. त्याने कबुल केले होते की, ज्यावेळेस आटोक्याचे बाहेर जाईल, त्यावेळेला वरूणाला आदेश देऊन आटोक्यात घेईल. आपण केले ते योग्यच केले. त्याच्या कृतीचे फळ त्याला मिळाले.
एकच, इंद्र तत्व काय, निर्माण करावयाचे असेल, तर अनेक इंद्र निर्माण करून कार्य सिद्ध करता येते. इंद्राला अहंपणा होता. ऋध्दी सिध्दी त्याच्या दासी आहेत. देवांचा राजा आहे तो !
कर्तव्य पालन करता येत नाही, त्या तत्वाला कवडीचीही किंमत नाही. तत्व म्हटले म्हणजे अधिकार दिले, तर त्याने जागृत राहावयास पाहिजे. आदेश म्हटले म्हणजे त्याला जागृत राहणे कर्तव्य आहे. अधिकाराचा दुरुपयोग होत असेल, तर दिलेले अधिकार काढूनही घेता येतात.
गेल्या वेळेला सांगितले की तत्वासाठी मानव आहे. मानवासाठी तत्व नाही. मानव हा षड्रिपूच्या जाळ्यात गुरफटलेला आहे, तर ते जाळे तोडून तत्वाची जाणीव करून घेणे हे त्याचे कर्तव्य आहे. मानवाने आपण मानवी जीवनात आल्यानंतर त्याचे कर्तव्य म्हणजे सत् ओळखण्यासाठी, स्वतःची ओळख पटण्यासाठी गुरुमुखातून जो ध्वनी दिला गेला, त्याने गुरुपदाची ओळख करून घेणे आहे. तत्व आणि मानव फार जवळ जवळ आहेत. (समाप्त)©️