सौ. माधवी – महामूनि कण्व यांची पत्नी – विश्वामित्र आश्रमात आले, त्यावेळेला त्यांच्या कमरेला सर्पाने विळखा घातला होता. आता पण अशी स्थिती आहे. पण हा साप निराळा आहे. त्यावेळी त्या मातीच्या सर्पाला मालकानी संजीवनी देऊन त्याच्याकडून कार्य करून घेतले. तेच सत् आहे.
आश्रमात २०० ज्योती होत्या. त्यावेळी सर्वस्व करावे लागत असे. सर्व मुले आपलीच आहेत. मदत देणारे आपोआप देतात. पती-पत्नी ही दोन्ही स्थिर असल्यानंतर संसार आपोआप स्थिर होतो. संसार स्थिर नसेल तर त्यात वादळे उत्पन्न होतात. ज्यावेळी संसार रुपी गाड्याची दोन चाके – पती आणि पत्नी – ही स्थिरपणे वाटचाल करू लागल्यानंतर गाडीवरील सामान आपोआप तरून इच्छित स्थळी जाता येते.
सत् सेवेकरी आणि सेवेकरीण यांचा प्रत्येक क्षण मोलाचा आहे. प्रत्येक क्षणाला किंमत असते आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने वाटचाल करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. श्रवणी, वाचा, दृष्टी कोणत्या तऱ्हेची असावी? तर सर्वस्व मालिकमय पाहिजे. ज्या ठिकाणी पहाल त्या ठिकाणी मालिक. जे शब्द ऐकाल, ते मालकांचे. सर्वस्व मालिकमय बनल्यानंतर गतीला वेळ नाही. मग का वेळ मिळणार नाही? सेवेकरीणीने पूर्णत्वाने मालिकमय बनावयास पाहिजे. ज्या जिभेने नामस्मरण करता त्या जिभेने अभद्र शब्द काढावयाचे नाहीत. अशा सेवेकरणीची दृष्टी सताकडेच वळत असते. असताकडे वळत नसते. असताकडे जाणार नाही. आपल्या काही ज्योती ठाम नाहीत असे खेदाने म्हणावे लागते. (समाप्त) ©️