श्री समर्थ मालिक – दिसते ते नसते, अशी जर कल्पना असेल तर पुनर्रपी जन्माला कोण येते? पाच तत्वांचा हा देह आहे. मग नसते काय? अन् अमर राहते काय? हा दृश्य अदृश्याचा खेळ आहे. प्रकृती अंग नटवले तरी, प्रकृतीला कोणत्यातरी निमित्ताने मी त्यागतो. पण कोणाच्या प्रेरणेने, याची गती प्रकृतीला मिळत नाही. भक्ती मार्गाने ज्योत गेली तर त्याला समजेल. पण बोल गेला, कृती झाली मग पश्चा:तापयुक्त होतो.
पण प्रथम काय? अमर कोण आहे हे गुह्य आहे. नाशिवंत जडत्व आहे. कधी दृश्य होते तर कधी अदृश्य होते. यात चेतना आहे. त्यांचा (सताचा) वास आहे. कोणीही मरत नाही. कोणाचाही नाश होत नाही. इतकेच की स्थूल देहाची जी अपेक्षा आहे ती दूर होणे कठीण आहे. पुनर्रपी जननम्, पुनर्रपी मरणम् असे म्हटले आहे.
पुढे काय होते? मी कोणत्या जन्माला येतो? मागच्या जन्मी मानव होतो की कोण होतो असे काही सांगता येत नाही. पण जाणे येणे हा सिद्धांत आहे. मग नाश काय होते? ८४ लक्ष योनी फिरावे लागते ते कोणाला? अन् नाही कोणाला, इतके तरी माहित आहे ना? मग नाश कोणाचा होतो? म्हणून सेवेकर्यांनी अभ्यासू व्हावे. अभ्यासू होण्याचा प्रयत्न करावा. पूर्वजन्मीच्या संचितातून कधी मोकळे होता येईल याचा प्रयत्न करणे. (समाप्त) ©️