मानव म्हणतात हा वेडा आहे. त्याच्या संगतीत राहून उपयोग नाही, पण त्याचे जे बळ असते त्याची खूण गांठ त्याने बांधलेली असते. त्याने निश्चयाचे बळाची शक्ती वाढविलेली असते. ती कोणालाही तोडता येणार नाही. नंतर अडी अडचणीतून त्याचा कस घेतला जातो. त्या कसातून उतरल्यानंतर त्याचे फळ त्याला मिळते. मग समर्थ त्याला अनवाणी पाठविणार नाहीत. त्याच्यावर पूर्ण लक्ष असते. त्याचा निश्चय, बळ त्याने कमावलेले असते. प्रकृतीच्या त्रासाला तो महत्त्व देत नाही. त्याने आपले बळ पूर्णत्व वाढविलेले असते. म्हणून त्याला त्याच्या कर्तव्याची फळे देऊन मोकळे होतात. म्हणून सत् भक्तीने प्रकाश की सत् भक्तीचा प्रकाश? हा प्रकाश सत भक्तीने मिळतो. नाही पेक्षा मानवाच्या मनाची भावना अनेक असते.
जगात देव आहे असे म्हणतात, पण भक्ती कशी करावी ते समजत नाही. मनाची भावना ज्याप्रमाणे, त्याप्रमाणे त्याला प्रकाश मिळतो. भक्ती कोणाचीही करा, त्याप्रमाणे त्याला गती दिली जाते. पण सत् भक्तीची गती न्यारी असते. अघोर गतीने जाणारे मानव चमत्कार लवकर करतात. पण सत् भक्तीत रममाण पुढे दुर्लभ आहे. तितकेच ते सोपे ही आहे. पण कसे? निश्चयाचे बळ, पूर्ण ठाम श्रद्धा याप्रमाणे राहिल्यानंतर त्याचे कोणीही काही करू शकत नाही. अशाच मार्गाने, सत् भक्तीचा प्रकाशाने सेवेकर्यांनी जाणे. हे संदेश आहेत. सेवेकऱ्यांनी निश्चयाचे बळ वाढविण्याचा प्रयत्न करावा. त्याने बळ जर वाढविले, तर तो या आसनाजवळ ओरडत येणार नाही. गार्हाणी आणणार नाही. श्रद्धेन सर्वे वश: हे सेवेकर्यांनी लक्षात ठेवावे. (समाप्त)