Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्री समर्थ मालिक – अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य …

गोवर्धन ऋषी ©️

गोवर्धन ऋषी ©️

गोवर्धन ऋषी –

जो तेजोमय चैतन्याचा गाभा, तो आज पूर्णत्वाने मिळाला. आतापर्यंतची कृती कर्तव्य, त्याचे फळ प्रत्यक्ष अनुभवायास मिळाले. ध्यानस्थ स्थितीत संकट ओढवले असताना, त्याची यत्किंचितही जाणीव न देता, त्याच स्थितीत ठेवले.

कोणते असे तत्व श्रेष्ठ होते की, त्या तत्वासाठी अहोरात्र टाहो फोडीत होतो, ते मिळाले नाही. परंतु आज प्रत्यक्षात मिळाले.

सद्गुरु नाम आणि ध्यान याच्या निराळे काही नाही. किती अफाट शक्ति आहे की, एवढे भयंकर संकट ओढवले असताना अजिबात जाणीव होऊ दिली नाही. कोणत्या निद्रेत होतो ते कळलं नाही. त्याची जागृती आज पूर्णत्वाने आली, मिळाली.

तेजोमय वलयरुपी चैतन्याचा अखंड लाभ व्हावा, ही आशा आहे. ज्या परब्रह्म शक्तीसाठी आजपर्यंत टाहो फोडला, ते अखंड दर्शन आज मिळाले. हेच अखंड मिळावे ही इच्छा आहे आणि दरबारची सेवा करण्याची इच्छा आहे. ज्या तऱ्हेची सेवा द्याल, त्या तऱ्हेची सेवा करण्याची इच्छा आहे. ©️

(समाप्त)

You cannot copy content of this page