Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्री समर्थ मालिक – अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य …

माया – नाम ©️

माया – नाम ©️

अक्षय मुनी

मायेच्या जाळ्यात गुरफटणाऱ्याला, अखंड दर्शन नाही. ते जाळे तोडून गेल्यानंतरच दर्शनाचा लाभ मिळेल. 

माया ही अमोल चीज आहे. जो मायावी जाळ्यात पूर्णपणे जखडून गेला, तो त्यातून केव्हाही सुटणे शक्य नाही. जो हे जाळे तोडून सद्गुरु शोधासाठी धावला, त्याला सद्गुरु दूर नाहीत. 

मायेचा अंत, मायेचा ठाव, कुठपर्यंत आहे, हे ज्याला कळले तोच सद्गुरुंचा ठाव घेतो. ज्याला हे गूढ कळले नाही, तो ठाव कदापिही घेऊ शकणार नाही. माया ही अमोघ शक्ती आहे. त्रिभुवन व्याप्त आहे. याच्या फार निराळे असे सद्गुरु ठिकाण आहे. ते पहाण्यासाठी मायेच्या वेष्टनाचे खंडन करावे लागते आणि ते खंडन करावयाचे असेल तर, ते अखंड नामानेच खंडन होवू शकते. या नामावर कोणतेही अस्त्र चालू शकत नाही. ज्याला मायेच्या वेष्टणातून पलीकडे जायचे आहे. मायेचे बंधन तोडावयाचे आहे, त्यानें ते नाम सद्गुरु मुखातून मिळविले पाहिजे. त्या नामाच्या अखंड ध्यानाने व ध्यासानेच सद्गुरु दर्शन, सद्गुरुंचा ठाव मिळतो. यांना कोणत्याही प्रकारची भिती नाही. नामाचा महिमा अगाध आहे. याची शक्ती फार बलाढ्य आहे. परंतु नाम मिळाल्यानंतर त्याला वेळ – काळाचे अगर ठिकाणाचे बंधन नाही. असे हे एकच श्रेष्ठ नाम आहे. नामाच्या (गतीने) जाणारा केव्हाही तरुनच निघतो. नाम हेच तारक आहे. मानव रुपी नौका तरुन जाण्याला नाम हे एकच साधन आहे. या नाम रुपी नौकेच्या साहाय्याने माया रुपी नदी तरुन, तो पैलतिरी जातो. पैलतीरी गेल्यानंतर सद्गुरूना डोळे भरून पाहतो. सर्वस्व सार्थक या नामातच आहे. याच्या निराळे काही नाही.

मायेच्या जाळ्यात गुरफटणाऱ्याला, अखंड दर्शन नाही. ते जाळे तोडून गेल्यानंतरच दर्शनाचा लाभ मिळेल. माया ही अमोल चीज आहे. जो मायावी जाळ्यात पूर्णपणे जखडून गेला, तो त्यातून केव्हाही सुटणे शक्य नाही. जो हे जाळे तोडून सद्गुरु शोधासाठी धावला, त्याला सद्गुरु दूर नाहीत. मायेचा अंत, मायेचा ठाव, कुठपर्यंत आहे, हे ज्याला कळले तोच सद्गुरुंचा ठाव घेतो. ज्याला हे गूढ कळले नाही, तो ठाव कदापिही घेऊ शकणार नाही. माया ही अमोघ शक्ती आहे. त्रिभुवन व्याप्त आहे. याच्या फार निराळे असे सद्गुरु ठिकाण आहे. ते पहाण्यासाठी मायेच्या वेष्टनाचे खंडन करावे लागते आणि ते खंडन करावयाचे असेल तर, ते अखंड नामानेच खंडन होवू शकते.

या नामावर कोणतेही अस्त्र चालू शकत नाही. ज्याला मायेच्या वेष्टणातून पलीकडे जायचे आहे. मायेचे बंधन तोडावयाचे आहे, त्यानें ते नाम सद्गुरु मुखातून मिळविले पाहिजे. त्या नामाच्या अखंड ध्यानाने व ध्यासानेच सद्गुरु दर्शन, सद्गुरुंचा ठाव मिळतो. यांना कोणत्याही प्रकारची भिती नाही. नामाचा महिमा अगाध आहे. याची शक्ती फार बलाढ्य आहे. परंतु नाम मिळाल्यानंतर त्याला वेळ – काळाचे अगर ठिकाणाचे बंधन नाही. असे हे एकच श्रेष्ठ नाम आहे. नामाच्या (गतीने) जाणारा केव्हाही तरुनच निघतो. नाम हेच तारक आहे. मानव रुपी नौका तरुन जाण्याला नाम हे एकच साधन आहे. या नाम रुपी नौकेच्या साहाय्याने माया रुपी नदी तरुन, तो पैलतिरी जातो. पैलतीरी गेल्यानंतर सद्गुरूना डोळे भरून पाहतो. सर्वस्व सार्थक या नामातच आहे. याच्या निराळे काही नाही. ©️

You cannot copy content of this page