Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

आदेश !!! ©️

आदेश !!! ©️

मानव षड्रिपूच्या जाळ्यात गुरफटला असला तरी ते तोडण्याचे सामर्थ्य आपल्या सद्गुरुं मध्ये आहे. त्यांचे बोल झेलणे हीच सहज स्थिती आहे. त्याचा ठेवा करून ठेवता ठेवता तो सदगुरुं जवळ येतो. मग सत् भक्ती बीजारोपण नंतर सद्गुरूंची ओळख, नंतर सत् शोधण्यासाठी आपल्या सद्गुरुंचा आदेश. बोल साधा, पण सहज गतीने निघालेला असतो. सद्गुरूंच्या मनात आल्यानंतर ते कोणालाही, केव्हाही सहज आदेश देतात. त्यात एकच, आपला सेवेकरी चरणांवर किती ठाम आहे, हेच सेवेकऱ्याने जाणावयाचे असते. कर्तव्य करीत रहा, फळ देणारे निराळे आहेत. मुलेबाळे सर्वस्व जरी असले तरी त्यांच्या पेक्षाही जे निराळे आहेत, ते शोधण्यासाठी तू चालला आहेस. ते शोधायचे का मुलांची काळजी घ्यायची? काळजी घेणारे फार निराळे आहेत.

प्रत्यक्ष उत्पत्ती स्थिती लय करणारा असला, तरी जो पूर्णपणे सद्गुरु चरणी लीन आहे, त्याची काळजी वाहणारे फार निराळे आहेत. अशी जी स्थिती आहे, कृती आहे, अशी जी सद्गुरु माऊली त्यांचा ठाव घेता येणार नाही. लागणारही नाही. लावता येणार नाही. जे गेले ते परत येत नाहीत. क्षणात अदृश्य होणारे ते परम निधान तत्व शोधायला जायचे असताना मुलाबाळांची काळजी घेणारे कोण आहेत? कृती करणारे कोण आहेत? चारा, उदक देणारे कोण आहेत? प्रत्यक्ष चरणांवर लीन असल्यानंतर त्याने काळजी करायची नसते. जो काळजी करतो, तो केव्हाही सदगुरू चरणांवर लीन आहे असे म्हणता येणार नाही.

कितीही महान शक्ती असली, कितीही श्रेष्ठ असला, तरी कोणालाही अडथळा करता येणार नाही. आपल्या सेवेकऱ्याला तारावयाचे असेल तर परम् तत्व आयुष्य देऊन ही तारतात. ज्या ज्योतीच्या पूर्व संचिताप्रमाणे नाश करावयाचा असेल, तर मानव केव्हाही त्याचे रक्षण करू शकणार नाही. सद्गुरूंवर ठाम निश्चय, विश्वास असेल, तर सेवेकऱ्यासाठी वेळेला आसनासही पळावे लागते.

मानव आपल्या पूर्व संचिता प्रमाणे श्रेष्ठ असला तरी ती ठेव देणारे, संचय करणारे, ठेवणारे कोणीतरी आहेत हे मानवानी समजावे. चालना देणारा कोणीतरी आहे. याची खुणगाठ प्रत्येकाने बांधावी. या दरबारचे सेवेकरी आदेशाचे महत्व किती मानणार आहेत हे अजमविल्या नंतर पुढचा विषय फार निराळा आहे.

कोकण साफ झाल्यानंतर दैवतांची सुटका करावयाची आहे. या दोन ज्योतीनी बहुतेक सात्विक दैवते पालथी घातली आहेत. त्या ज्योतींचे अनुयायी जे विखुरलेले होते तेच अनुयायी दैवतांचा बहाणा करून वावरत होते. काही दैवते पाताळात गाडली गेली आहेत. सात्विक दैवते आहेत. त्यांची स्थिती चमत्कारिक झाली आहे. त्यांची सुटका करण्यात येईल.कलियुग आहे हे ! याची मालिकाच अशा तऱ्हेने भूतलावर पसरली आहे.(समाप्त) ©️

You cannot copy content of this page