श्री समर्थ मालिक – भक्ती ही साधी, सोपी अन् सुलभ आहे, पण त्या भक्तीची लाज राखणे दुरापास्त आहे. भक्तीला तेज आणणे सेवेकऱ्यांचे कर्तव्य आहे, पण ते त्यांच्या हातून होत नाही म्हणून सेवेकरी फसतो. वाट चुकल्यानंतर त्याला ठेचा लागतात. मग त्यात दोष कोणाचा आहे?
दरबारात आपण विचारणा केली होती,“प्रेमसूत्र नेतो तिकडे जातो श्री हरी”, मग या दरबारात एका छायेखाली असलेल्या सेवेकऱ्यांचे प्रेम फार उतू चालले आहे असे आहे का? मग मी कोणत्या सेवेकर्याकडे वळावे? या ठिकाणचे सेवेकरी एकाच प्रेमसूत्रात आहेत का?
अजूनही वेळ गेलेली नाही. भक्ती प्रेमात निमग्न होण्याचा प्रयत्न करा. एकाच पित्याची तुम्ही लेकरे आहात हे ध्यानात ठेवा. या सृष्टीतील सर्व लेकरे जरी त्यांची असली तरी काही जण ते दूर का अन् तुम्ही सानिध्यात का? अजून विचार करा. इतकेही करून सर्वस्व गंगेत वाहिल्या सारखे होईल. ©️
