Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

सागरासारखे विशाल व्हा ! ©️

सागरासारखे विशाल व्हा ! ©️

श्री समर्थ मालिक – सेवेकऱी प्रवचन ऐकतात, पण त्याप्रमाणे कोणी सेवेकरी चालतात का? आदेश मानतात का? मनात रुजू करून घेतात का? सत् हे कोणाकडून काय करून घेईल हे सांगता येणार नाही. तुम्हाला सांगून ते करून घेईल का? तर नाही. सेवेकऱ्यांच्या मनात शंका कुशंका का येतात?

या दरबारात काय चालते हे मी पूर्णत्वाने जाणतो. सेवेकर्‍यांची मने शुद्ध किती आहेत हे पण जाणतो. यात सद्गुरूंचा दोष नाही. सेवेकरी आपल्या कृतीचे फळ आपल्या ओटीत घेतो. सेवेकरी फसतो तो कशामुळे फसतो? काय कारणाने वाहत जातो? तर मनात शंका आणतो म्हणून फसला जातो, त्यात सताचा काय दोष आहे?

अनेक वेळेला सांगितले, मला आदी अंत काहीही नाही. ॐ कारांचा कोणी अंत घेतला आहे का? जे अखंड तत्व बहाल केले आहे, त्यात किती सेवेकरी रममाण झाले आहेत? एक एक तप झाले तरी शंका रहित होत नाहीत. शंकेला डावलू शकत नाहीत, मग हा सेवेकरी कसला? असत कृतीचा खजाना सेवेकरी वाढवू लागला, तर माझा त्यात काही दोष आहे कां?

आसनाधिस्त काही गोष्टी बाहेर कुणाला सांगू नका म्हणून सांगत असतात, त्या तुम्ही उघड करता. ज्यांनी मस्तकी हस्त ठेवला, त्यांचा शब्द तुम्ही मानला आहे का? त्यांचा शब्द तुम्ही अव्हेरता.

एका तत्त्वाचे सेवेकरी, एका सद्गुरूची लेकरे असताना सेवेकऱ्यांची मने अजून गढूळ का आहेत? केव्हा शुद्ध होतील? बोलांची टोचणी करून अजूनही सेवेकरी सागरातल्या जलाप्रमाणे होत नाहीत. हो ! पण सागरातील जल खारट असते. प्रत्येक सेवेकरी खारट झाला, तर कसे जमणार? पण त्या सागरासारखे तरी सेवेकरी आहेत का? विशाल ! ©️

You cannot copy content of this page