Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

सत् दूर नाही…©️

सत् दूर नाही…©️

श्री समर्थ मालिक – आकारीले तितुके नासे | एरवी तत्त्व असे ते अविनाशी || 

आकारी ही माया असते. नासे म्हणजे काय? जडत्व फेकून दिल्यानंतर आकार निर्माण करावा लागतो. म्हणजे आकार दृष्य झाला असे वाटते, कोणाला अन् नाही कोणाला? स्थानवंत आहे त्या अर्थी आकारी आहे. आकारी असून निराकारी आहे त्याचा ठावठिकाणा नाही.

आत्तापर्यंत प्रवचने होत आली ती का अन् कशासाठी हे येथील सेवेकऱ्यांना माहित असेलच. ही प्रवचने कडक का झाली? सेवेकरी चुकले म्हणून ना? मग झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करणे. मी कोणीही नाही, मी निमित्त मात्र आहे. असे जरी म्हटले तरी एक तत्त्व यात लबाडी करणारे आहे म्हणून सेवेकरी बोलतो आणि फसतो.

सेवेकऱ्यांनी स्वतःच्या मनाचे शोधन केले पाहिजे. मी सेवेकरी कोणाचा? मी कोण व माझे कर्तव्य काय? हे प्रथम शोधले पाहिजे. मन सर्वांगीण शुद्ध ठेवले पाहिजे. मायेचे सुद्धा बोल पडतात. जर मायेच्या आधीन झाला तर त्याचप्रमाणे त्याला मालिक वाटचाल करावयास लावतात. पण माया तरी अंत लागू देईल का? सेवेकही मायेच्या आधीन गेला तर माया फसवणारच, पण मायेच्या आधीन गेला नाही तर माया फसविणार नाही. मायेच्या रहित कोणीही नाही. पण त्याला मर्यादा आहे. मर्यादशील मायेला ठेवलीच पाहिजे. नाही पेक्षा माया कोठे चढवील आणि कोठे पाडील याचा अंत नाही. सेवेकऱ्यास वाटत असेल की माझे सताचेच बोल आहेत, पण नाही. याचे शोधन सेवेकर्‍यांने करावयास हवे. हे बोल कोणाचे आहेत, यात चिकित्सक राहिले पाहिजे. माझ्या सद्गुरूंचे आदेश, संदेश पाळून त्या दिशेने सेवेकरी राहील तर सत् त्याच्यापासून दूर नाही. ©️

You cannot copy content of this page