Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

सेवेकर्‍याने कसे वागावे?©️

सेवेकर्‍याने कसे वागावे?©️

श्रीसमर्थ मालिक – प्रत्येक सेवेकऱ्याची योग्यता महान पदाची आहे. सेवेकऱ्याने वाटचाल करीत असताना सद्गुरु मूर्ती डोळ्यासमोर ठेवून अखंड ठेवा जो बहाल केलेला आहे, त्याचे मुखाने नामस्मरण करीत वाटचाल केली, तर त्याच्यासारखा भाग्यवान तोच !

सत् मिळणे फार दुरापास्त आहे. रिद्धी सिद्धीच्या कोनातून वाटचाल कराल, तर आपली गती त्या चांगदेवासारखी होईल. आपल्या प्रभावाने चांगदेवाने सुद्धा काळाला फसविले होते, पण शेवटी तो कोराच राहिला, मग मुक्ताने त्याला अनुग्रह दिला.

वाटेल ते मिळेल पण सत् सानिध्य मिळणे दूरापास्त आहे. देणारा देतो पण, टिकविणे फार कठीण आहे. आता इतकेच, काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळली आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण कोणत्याही स्थितीत शोधा-शोध केली, तर आपणास कळेल की, हे अखंड नाम कोणत्याही ठिकाणी दिले जात नाही.

येथे सांगितले जाते, ते अनुभवातले सांगितले जाते. प्रत्यक्ष सहजासहजी विषय निघाला की त्याच्यावर प्रवचन सुरू होते. सत् सानिध्यात राहून, सतावर फार नितांत श्रद्धा असावी लागते, नाही पेक्षा जसे सेवेकरी तसे मला वागावे लागते. सेवेकरी नितांत, मी पण नितांत. सेवेकरी आत बाहेर, मग मलापण नाईलाजाने तसे वागावे लागते. ©️

You cannot copy content of this page