Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – शरीर मन सोडून नाही आणि मन शरीर सोडून नाही. शरीराला त्रास झाला तर मनाला त्रास …

सेवेकरी चकतो का? ©️

सेवेकरी चकतो का? ©️

श्री समर्थ मालिक – सेवेकरी चकतो का? कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार नाहीत. जो सेवेकरी येथे ऐकतो व बाहेर गेल्यानंतर विसरतो, त्याला अनेक विवंचना निर्माण होतात व त्यातच तो गुरफटला जातो.

खरोखरच येथील सेवेकऱ्यांजवळ एवढे अखंड तत्व सतत पाठीशी उभे असताना, त्या सेवेकऱ्यांनी हातात माती जरी घेतली, तरी त्या मातीचे सोने करण्याची कुवत सतात असते, पण ही पात्रता ज्याची त्याने राखावयाची असते. कोणत्याही ठिकाणी सेवेकरी जावो, जर अडी-अडचणी आल्या तर काळ सुद्धा त्याठिकाणी फिरकत नाही.

प्रत्येक सेवेकऱ्याची योग्यता महान पदाची आहे. सेवेकऱ्याने वाटचाल करीत असताना सद्गुरु मूर्ती डोळ्यासमोर ठेवून अखंड ठेवा, जो काय बहाल केलेला आहे, त्याचे मुखाने नामस्मरण करीत वाटचाल केली, तर त्याच्यासारखा भाग्यवान तोच !

सत् मिळणे फार दुरापास्त आहे. रिद्धी सिद्धीच्या कोनातून वाटचाल कराल, तर आपली गती त्या चांगदेवासारखी होईल. आपल्या प्रभावाने चांगदेवाने सुद्धा काळाला फसविले होते, पण शेवटी तो कोराच राहिला, मग मुक्ताने त्याला अनुग्रह दिला. वाटेल ते मिळेल पण सत् सानिध्य मिळणे दूरापास्त आहे. देणारा देतो पण, टिकविणे फार कठीण आहे. (पुढे सुरु…२)©️

You cannot copy content of this page