Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

सेवा आणि सेवेकरी ©️

सेवा आणि सेवेकरी ©️

श्री समर्थ मालिक – सेवा आणि सेवेकरी याचे स्पष्टीकरण झालेले आहे, तरी सेवा आणि सेवेकरी याचा अर्थ पूर्णत्वाने अजून समजलेला नाही. सेवेकऱ्याने सेवा कोणाची करायची आणि काय सेवा करणार याचा प्रत्येक सेवेकर्‍याने आपल्या मनात अर्थ लावणे, याचे स्पष्टीकरण करणे. या सर्वस्वाचे स्पष्टीकरण आपणास पुढे मिळेल.

अखंड आसनाचे सेवेकरी महान पदाचे आहेत. त्याप्रमाणे त्याने सेवा कोणाची, कशी करावयाची? अल्पबुध्दीने, स्वयंम स्फूर्तीने केलेली पूजा चरणांवर रुजू करून घ्यावी लागते. मात्र सेवेकर्‍याने मनात क्लेश करावयाचे नाहित. माझी पूजा चरणांवर रुजू होणार की नाही हे बिलकुल मनात आणावयाचे नाही. मनाची अशी स्थिती झाल्यास ती पूजा चरणांवर रुजू होत नाही.

सत् पद महान आहे. सेवा करताना लिनता, नम्रता, शांती या तीन तत्त्वांचे पूर्णत्वाने पालन करावयाचे असते, अमलात आणावयाची असतात आणि याप्रमाणे लिनता, नम्रता, शांती ही तीन तत्वे पूर्णत्वाने अमलात आणावयास पाहिजेत.

सेवा कोणती आणि कोणत्या प्रकारची याला महत्व नाही. परंतु आसनाचे पूर्णत्वाने नियम पाळणे, ते पूर्णत्वाने आचरणात आणणे हे महत्त्वाचे आहे. त्या पदाचा महिमा फार मोठा आहे. ज्याने सद्गुरुना ओळखले, पाहिले तोच सेवेकरी धन्य होय. याच्यासाठीच ही सर्वस्व धडपड आहे. ते महान तत्व आज अखंडत्वाने या ठिकाणी खडे आहे. आजच्या या शुभ दिनी सर्व सेवेकरी या ठिकाणी धाव घेत असतात. याचे कारण सतपदाचा महिमा ! त्याचे वर्णन कोणीही केलेले नाही. कोणालाही करता येणार नाही. सद्गुरु चरणाच्या लाभाचे महत्त्व ज्यांना कळले, समजले ते सेवेकरी फार प्रयत्नाने त्यांची गती घेत असतात. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page