श्री समर्थ मालिक – एका सेवेकऱ्याचे पत्राद्वारे संदेश काय येतात, त्याला तुम्ही हसता हे बरोबर दिसते का? एखाद्याला वाईट वाटेल असे बोलता, कधी कुणी चेष्टा-मस्करी करतात, कधी कधी कुणी पायरी सोडून वागतात हे कितपत योग्य आहे? ह्याचा विचार करा.
आसन जागे नाही झोपले आहे असे आपण समजता का? हा दरबार हसण्याचा आहे का? हसत होता मग मुख्य ज्योतीने रोखले का नाही? ज्या सद्गुरुंना तुम्ही शरण आहात, ते आपमतलबी आहेत का? मग का हसलात? ही प्रेम सूत्राची दोरी कोण कुणीकडे नेतो? नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे !
अशा या सेवेकऱ्यांना ब्रह्मज्ञान सांगण्याची आवश्यकता नाही. इतकेच मला सांगावयाचे, की सत कर्तव्याने जी ज्योत जाईल तिच फळ चाखील. जी जाणार नाही, त्याच्या सारखा अभागी तोच ! मला या सेवेकऱ्यांबद्दल नाराजी वाटते. छाया काढून घेतली तर मग समजेल काय ते ! मग काहीच राहणार नाही. कोठे काय होईल हेच कळणार नाही. सेवेकरी फार मायावी आहेत असे आम्ही म्हणावे कां? ©️
