श्री समर्थ मालिक – आकारीले तितुके नासे | एरवी तत्त्व असे ते अविनाशी ||
आकारी ही माया असते. नासे म्हणजे काय? जडत्व फेकून दिल्यानंतर आकार निर्माण करावा लागतो. म्हणजे आकार दृष्य झाला असे वाटते, कोणाला अन् नाही कोणाला? स्थानवंत आहे त्या अर्थी आकारी आहे. आकारी असून निराकारी आहे त्याचा ठावठिकाणा नाही.
आत्तापर्यंत प्रवचने होत आली ती का अन् कशासाठी हे येथील सेवेकऱ्यांना माहित असेलच. ही प्रवचने कडक का झाली? सेवेकरी चुकले म्हणून ना? मग झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करणे. मी कोणीही नाही, मी निमित्त मात्र आहे. असे जरी म्हटले तरी एक तत्त्व यात लबाडी करणारे आहे म्हणून सेवेकरी बोलतो आणि फसतो.
सेवेकऱ्यांनी स्वतःच्या मनाचे शोधन केले पाहिजे. मी सेवेकरी कोणाचा? मी कोण व माझे कर्तव्य काय? हे प्रथम शोधले पाहिजे. मन सर्वांगीण शुद्ध ठेवले पाहिजे. मायेचे सुद्धा बोल पडतात. जर मायेच्या आधीन झाला तर त्याचप्रमाणे त्याला मालिक वाटचाल करावयास लावतात. पण माया तरी अंत लागू देईल का? सेवेकही मायेच्या आधीन गेला तर माया फसवणारच, पण मायेच्या आधीन गेला नाही तर माया फसविणार नाही. मायेच्या रहित कोणीही नाही. पण त्याला मर्यादा आहे. मर्यादशील मायेला ठेवलीच पाहिजे. नाही पेक्षा माया कोठे चढवील आणि कोठे पाडील याचा अंत नाही. सेवेकऱ्यास वाटत असेल की माझे सताचेच बोल आहेत, पण नाही. याचे शोधन सेवेकर्यांने करावयास हवे. हे बोल कोणाचे आहेत, यात चिकित्सक राहिले पाहिजे. माझ्या सद्गुरूंचे आदेश, संदेश पाळून त्या दिशेने सेवेकरी राहील तर सत् त्याच्यापासून दूर नाही. ©️
