Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – शरीर मन सोडून नाही आणि मन शरीर सोडून नाही. शरीराला त्रास झाला तर मनाला त्रास …

“तुरत दान महापुण्यम” नाही. पुढे ही ज्योत कुठे जाणार आहे याची सर्वस्वी नोंद त्यांच्याजवळ असते. सद्गुरूंना सर्वस्वाची कल्पना असते. अन हाच राजमार्ग …

श्री समर्थ मालिक प्रवचन ©️

श्री समर्थ मालिक प्रवचन ©️

श्री समर्थ मालिक –अखंड सत् तत्वाची गती मिळवून दिली, त्या अखंड तत्त्वापासून कोणत्या रस्त्याने गेल्यानंतर काय होते, काय नाही, खरे किती, खोटे किती याचा सेवेकऱ्यांनी बोध घ्यावा. पण त्या सेवेकऱ्याची कृती सत् पाहिजे. ती कोणत्या तर्‍हेची पाहिजे? मी सत् किती करतो, असत किती करतो, मायेत राहून सताचे घर्षण करणे, सानिध्य मिळविणे, त्याचा पूर्ण अंत:करणापासून उजाळा करणे, म्हणजे बुद्धीला सत चेतना मिळते, याला म्हणतात बोध !

ज्याने अखंड पदाची माहिती दिली, ते तत्व कोणते आहे, हे सेवेकऱ्यानी अद्याप पर्यंत आपल्या ध्यानात घेतले नाही. मनाला जी कलाटणी मिळते, त्या कलाटणीला बाजू देऊन वाटचाल करणे. मला रंग ना रुप, वास ना गंध, मग आकार कोणीही द्यावयाचा? ज्यांनी खूण दाखविली, त्याचाच आकार द्यावयाचा असतो.

करतो कोण? करविता कोण? करून घेणारा कोण? व्यवहार चालतो कशापासून? इतकेच की, मी माझे अंग दाखवत नाही. मायेकडून कार्य करून घेतो.

जो सेवेकरी सत् मार्गाने चालला आहे, तो मात्र शुद्ध अंतःकरणाने लिन होऊन सत् गतीने वाटचाल करतो, तोच ओळखू शकतो, करतात ते मालिक करतात. मी निमित्त आहे असे सेवेकरी म्हणेल, मग मात्र बोधामृत चाखावयास मिळेल. सेवेकऱ्यांनी कर्तव्यात जागृत राहणे, उजाळा करणे. त्याचा उजाळा झाला की, प्रकृतीचा उजाळा होतो.

प्रकृती जोपर्यंत अभिन्न होत नाही, तोपर्यंत मन अभिन्न होत नाही. मन जर भिन्न ठेवले, तर सर्वच भिन्न दिसेल. मनाला अभिन्न बनवा हेच संदेश आहेत.सत भक्तीसाठी प्रकृतीमध्ये एवढे स्नेह आहेत, ते सत चरणात निमग्न होऊन ओलावले असतील, तर एकाच ठिकाणी स्थीर राहतात. मन अमृतमय झालेले असते. रसना, प्रेम जर अमृतमय झाले, मग मन कोठे जाईल? जी इंद्रिये आहेत, ती सद्गुरुमय झाल्यानंतर इकडे तिकडे होतील का? भक्तीला प्रथम प्रेम पाहिजे. ते प्रेम शुद्ध असेल तर मन आकळता येते.

स्नेह अमृत झाल्यानंतर मग तो पाझर फुटतो तो कोठे जातो? १७ वी जीवनकळा कोठून सुटते? सर्वस्व स्नेह ओलावले, तन्मयता साधली, पूर्ण निमग्न झाला कि नंतरच १७ वी जीवनकळा ‌ सुटल्यानंतर तो पाहू शकतो. त्या सुखासाठी रसना ओलावली पाहिजे. मन शुद्ध झाले पाहिजे. भक्तीला प्रथम प्रेम पाहिजे. भाव पाहिजे. पण तो कसा पाहिजे? तर शुद्ध स्फटिकासारखा पाहिजे. प्रेम पाहिजे. रसना ओलावल्या मग त्याच अमृतमय होतात. पण त्याला प्रकृती कशी हवी? हे कशाने होईल? कसे होऊ शकते? रसना ओलावण्याकरिता काय पाहिजे? याला स्वतःचा पाया, घर मजबूत पाहिजे. प्रकृती शुद्ध पाहिजे. प्रकृती शुद्ध झाल्यानंतर मग वेळ आहे का? भूमी शुद्ध नसेल तर रसना ओलावणार नाहीत. म्हणून प्रथम प्रकृती शुद्ध पाहिजे.

समर्थ प्रकृती पाहूनच आपल्याला आपल्या सानिध्यात घेतात. नाहीतर सानिध्य मिळणे दुरापास्त आहे. सकळ मंगळे त्या ठिकाणी वळल्यानंतर बाकी काय राहते? शुद्धात शुद्ध मिसळल्यानंतर अशुद्ध राहील का? अशी दृष्टी मंगलमय झाल्यानंतर सर्वत्र समर्थांना पाहू शकतात. असे दिसत असताना सेवेकऱ्यांना थोडी हुक्की येते. मग हा सेवेकरी असा कधी होईल बरे?

आर्यवर्ता पासून जे महान सतपुरुष होऊन गेले ते एकमेकांची टिंगल करीत नव्हते. सर्वस्व मंगले या ठिकाणी रममाण करण्याचा प्रयत्न करा. सकळ इंद्रिये ब्रह्मरूप झाली तर बाकीचे काय उरले? मग सत् आणखी वेगळे आहे का? म्हणून तुम्ही विचार करा. सेवेकरी कसा पाहिजे? त्याची पात्रता कोणती पाहिजे? अजून सेवेकरी पूर्ण झालेले नाहीत. म्हणून सेवेकर्‍यांनी सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page