Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्री समर्थ प्रवचन -©️

श्री समर्थ प्रवचन -©️

दरबार हा दरबार आहे. आसन हे आसन आहे ! ज्या ठिकाणी बसाल त्या ठिकाणी दरबार आहे. त्या ठिकाणी आसन आहे.

जशी संघर्षणे होतात, तसे सताकडून आदेश सुटत असतात. जे खेळ खेळावयाचे ते प्रत्यक्ष सत् खेळत नाही, तर जी लाघवी शक्ती, ती खेळ खेळत असते. काहीही स्थित्यंतरे झाली, उलथा-पालथ झाली तरी सत् ते सतच राहणार आहे. ते एकदा प्रकट झाले की, मग कोणालाही आटोपता येणार नाही. एक जरी सताचा किरण प्रगट झाला, तरी तो कुणालाही सहन होणार नाही. आज जरी मायावी कृती दिसली नाही, तरी ती जरूर दिसण्यात येईल.

ज्या वेळेला संघर्षण चालले होते, समुद्रमंथन चालले होते, त्या वेळेला मानवी तऱ्हेने १४ रत्ने काढली. देव दानवांचा झगडा चालला होता. एवढे खरे की, संजीवनी आणि अमृत दोन बाजूला दोन ठेवली होती. ज्यांना सापडले त्यांनी पळविले. दिले कोणी कोणाला? संजीवनी महान विद्या आहे. शुक्राचार्यांनी जे साधले ते बृहस्पतीला साधता आले नाही. जी विद्या शुक्राचार्याला मिळाली, ती त्यांनी जतन केली. त्याने वाढवली. यामुळे दानवांची संख्या घटत नव्हती, म्हणून ती विद्या मिळविण्यासाठी कोणाला पाठवले? कच हा बृहस्पतिचा मुलगा. ज्योत उच्च पातळीची होती आणि त्याच्याकडून कार्य करून घ्यावयाचे होते, म्हणून त्याला पाठविण्यात आले होते. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page