Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

उत्तम धर्म कोणता? ©️

उत्तम धर्म कोणता? ©️

श्री विठ्ठल – उत्तम धर्म कोणता? तर मानव धर्म! मानव म्हणजे पूर्ण ओंकार स्वरूप आहे. पण काही मानवांना घेता येत नाही. या मानव जन्मात लांड्या लबाड्या करणे, आदेश मोडणे, आदेश धुडकावणे, याची शिक्षा म्हणून हे सत् तत्व काय करील याचा अंत मला सुद्धा नाही. पण इतके सांगायचे की, एकाचा अंत घ्या, मग शून्याचा ठाव मिळेल. एकाला सोडून शून्याचा ठाव लागणे, अंत लागणे कठीण आहे.

या ठिकाणी काही सेवेकरी आहेत, ते शून्याचा ठाव घेण्याच्या पाठीमागे आहेत. मी जरी महान तत्व असलो, तरी या ठिकाणी (या दरबारात) मी अज्ञान आहे. या ठिकाणी त्या पात्रतेचे सेवेकरी नाहीत, म्हणून प्रवचनांची जोड या ठिकाणी तुटलेली आहे, असे मला वाटते. जो भक्त अभिन्न बनला आहे, त्यालाच सताचे दर्शन होत असते. ज्याला सताचे दर्शन मिळाले, त्याला मी दूर नाही, पण मानव अभिन्न बनला पाहिजे. अभिन्न बनला नाही, तर त्याला गती मिळणार नाही. सत् हे सतावरच अवलंबून असते. ते असतावर अवलंबून नसते. पण असत म्हणते, मी फार चलाख आहे. सत् जरी शांत असले, तरी असताला तूरी लावून केव्हाच लांब जाते. मायेला टिचकी मारून त्यांचे कर्तव्य करून घेते. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page