Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्रद्धेने वाटचाल करा – ©️

श्रद्धेने वाटचाल करा – ©️

श्री समर्थ मालिक – कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार नाहीत. जो सेवेकरी येथे ऐकतो व बाहेर गेल्यानंतर विसरतो, त्याला अनेक विवंचना निर्माण होतात व त्यातच तो गुरफटला जातो.

खरोखरच येथील सेवेकऱ्यांजवळ एवढे अखंड तत्व सतत पाठीशी उभे असताना, त्या सेवेकऱ्यांनी हातात माती जरी घेतली, तरी त्या मातीचे सोने करण्याची कुवत सतात असते, पण ही पात्रता ज्याची त्याने राखावयाची असते.

कोणत्याही ठिकाणी सेवेकरी जावो, जरी अडी-अडचणी आल्या तरी काळ सुद्धा त्याठिकाणी फिरकत नाही. प्रत्येक सेवेकऱ्याची योग्यता महान पदाची आहे. सेवेकऱ्याने वाटचाल करीत असताना सद्गुरु मूर्ती डोळ्यासमोर ठेवून अखंड ठेवा, जो काय बहाल केलेला आहे, त्याचे मुखाने नामस्मरण करीत वाटचाल केली, तर त्याच्यासारखा भाग्यवान तोच !

सत् मिळणे फार दुरापास्त आहे. रिद्धी सिद्धीच्या कोनातून वाटचाल कराल, तर आपली गती त्या चांगदेवासारखी होईल. आपल्या प्रभावाने चांगदेवाने सुद्धा काळाला फसविले होते, पण शेवटी तो कोराच राहिला, मग मुक्ताने त्याला अनुग्रह दिला. वाटेल ते मिळेल पण सत् सानिध्य मिळणे दूरापास्त आहे. देणारा देतो पण, टिकविणे फार कठीण आहे. ©️

You cannot copy content of this page