Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

मी केले…©️

मी केले…©️

श्री संत तुकाराम – सताने म्हटले आहे की ही दृष्टी सगुण रूपात निमग्न होऊ दे. त्यातच सर्व काही होईल. सगुणा पासून दृष्टी लांब घालवू नको. म्हणूनच म्हटले आहे, सगुणाचा सार येणे नाम संसार ! म्हणजे सगुण पाहता पाहता भक्त निर्गुणाप्रत आपोआप जातो.

जो माझे माझे म्हणतो, हे मी केले, ते मी केले म्हणतो, तो कधीही निर्गुणाप्रत जाणार नाही, त्याला निर्गुणाप्रत जाऊ देणार नाही. पण तो काय करतो आहे, काय घेतो आहे, काय नेतो आहे हे त्याला कळलेले नाही. मग माझे माझे का म्हणतो तेही त्याला कळत नाही.

जन्माला फेकल्यानंतर तो कसा असतो? कर्माच्या शाखा दोन – सत् आणि असत ! मग असत मार्गाने गेल्यानंतर तो पूर्ण बध्द झाला, मग तो जन्माला आला काय आणि नाही आला काय, सारखाच ! समर्थ आपल्या ऋणातून मुक्त होतात. त्याला मानव जन्म देतात, पण तो पुढे मायेच्या आधीन बनून असत मार्गाने जातो. मग करतो ते सर्वस्व मीच करतो आणि अशा तऱ्हेने त्याचा आवाज कथला प्रमाणे बद्ध निघतो. त्यामुळे तो सर्व विसरून जातो. त्याला जगात दिसते तेच प्यार वाटू लागते. त्यामुळे तो सत मार्गाने जाऊ शकत नाही. पूर्वजन्मीच्या रंग ढंगाप्रमाणे तो जातो. त्याला सत् सानिध्य सापडत नाही. ©️

You cannot copy content of this page