Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – शरीर मन सोडून नाही आणि मन शरीर सोडून नाही. शरीराला त्रास झाला तर मनाला त्रास …

“तुरत दान महापुण्यम” नाही. पुढे ही ज्योत कुठे जाणार आहे याची सर्वस्वी नोंद त्यांच्याजवळ असते. सद्गुरूंना सर्वस्वाची कल्पना असते. अन हाच राजमार्ग …

मन स्थिर होण्यासाठी – ©️

मन स्थिर होण्यासाठी – ©️

श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज – मन स्थिर होण्यासाठी तू त्यागी रहा. जे काही भले बुरे केले असेल, ते मला अर्पण कर. मन हे संपूर्ण समर्थांना अर्पण झाले, तर ते कधीही अस्थिर राहणार नाही. मी कोणीही नाही, हे सर्वस्व समर्थ चरणांवर वाहिलेले आहे अशी निष्काम भावना पाहिजे.

जीवात्मा जेव्हा शिवात्मा होतो त्यावेळेला तो निष्काम होतो. जीवात्मा दृश्य आहे तोपर्यंत सकाम वृत्ती आहे. जीवदशा म्हणजे एक लहर आहे. म्हणजेच मनाची ठेवण आहे. सकाम आशा समर्थ चरणांवर वाहिली कि ती शुद्ध होते. मग मन:स्वास्थ मिळते.

दर्शनात जाणीव रहीत होणे तेच परमसुख आहे. बाकीचे ते दुःख आहे. शरीर जर तुमचे नाही, तर बाकीचे काय तुमचे असणार? सुख पाहिजे असेल तर परम गतीत स्थिर होणे. सुख हे क्षणैक आहे. आपणाला कायम टिकणारे सुख पाहिजे आहे.

मानव जन्म कशासाठी समर्थांनी बहाल केलेला आहे, तर आपण उत्तम तर्‍हेचा मार्ग आक्रमून आपणात असणारा अविनाशी कधी पाहता येईल, समर्थ दर्शन कधी घडेल यासाठी मानव जन्म आहे. जड म्हणजे दृश्य स्वरूपाच्या सार्थकासाठी प्रत्येकाने तळमळावयाचे आहे. आपण जडत्व व जडत्वाचा परिणाम मनावर धारण करीत असतो, पण जडत्वाच्या ठिकाणी आशक न राहता परम गतीत आपले मन स्थिर केले, तर मग आपली मनोभावना निष्काम होते. जडत्व असल्याशिवाय सताची जाण घेता येणार नाही, बैठक मारता येणार नाही, म्हणून जडत्वाची आवश्यकता आहे आणि ती राहणारच ! पुढे सुरु…..२ ©️

You cannot copy content of this page