Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्री समर्थ मालिक – अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य …

भक्ति – साधी आणि सोपी – अलख – प्रवचन ©️

भक्ति – साधी आणि सोपी – अलख – प्रवचन ©️

भक्ती साधी सोपी आहे. ती कोणाला? असत मार्गी ज्योती भक्ती करतात. तिला भक्ती म्हणता येईल का? 

मी सेवेकरी आहे. मी मालकांसाठी काय केले आहे? मालकांना सर्वस्वी जाणीव आहे. सेवेकऱ्यानी म्हणू नये की, मी करतो ते मालकांना काय माहीत? मालिक सर्व पहात असतात. सेवेकऱ्याची अब्रू गेली तर मालकांचीही जाते. जो सेवेकऱ्यांचा मान तोच मालकांचा मान. त्यासाठी सेवेकऱ्यानीं आतून बाहेरून पूर्णांगी शुद्ध असले पाहिजे. माझे मालिक याशिवाय काही नाही.

हे जर बोल निघून तो जर मालकांच्या ठिकाणीं तन्मय असेल तर दर्शनाला विलंब नाही. मालिक कस घेतात. आसनाधिस्तांचा जसा कस घेतला तसा सेवेकऱ्यांचा घेतला, तर एकही टिकणार नाही. परंतु फक्त मनाचाच कस घेतात. पूर्व योनीत घडलेले कर्मसंचित चांगले म्हणूनच याठिकाणी आलात. त्याचप्रमाणे आता सत् केले तर पुढे कामाला येईल. जे ऐकता ते मनन पूर्वक ध्यानात ठेवा. त्याच्यावर येथून गेल्यावर पूर्णत्वाने विचार करा. सेवेकरी हा सत् मार्गानेच जावयास पाहिजे. (सुरू…१)©️

You cannot copy content of this page