Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – शरीर मन सोडून नाही आणि मन शरीर सोडून नाही. शरीराला त्रास झाला तर मनाला त्रास …

प्रवचन म्हणजे काय? ©️

प्रवचन म्हणजे काय? ©️

श्री समर्थ मालिक – प्रवचन म्हणजे काय? परांचे वचन, त्यांचे बोल ! ते ऐकण्याची इच्छा म्हणा. सेवेकऱ्यांची महान इच्छा असते प्रवचन ऐकण्याची, पण त्याप्रमाणे कोणी सेवेकरी चालले आहेत का? आदेश मानले आहेत का? मनात रुजू करून घेतले आहेत का?

सत् हे कोणाकडून काय करून घेईल हे सांगता येणार नाही, मग तुम्हाला सांगून ते करून घेईल का? सेवेकऱ्यांच्या मनात शंका कुशंका का? या दरबारात काय चालते हे मी पूर्णत्वाने जाणतो. सेवेकर्‍यांची मने शुद्ध किती आहेत हे पण जाणतो. यात सद्गुरूंचा दोष नाही. सेवेकरी आपल्या कृतीचे फळ आपल्या ओटीत घेतो. सेवेकरी फसतो तो कशामुळे फसतो? काय कारणाने वाहत जातो? तर मनात शंका आणतो, म्हणून फसला जातो. त्यात सताचा काय दोष आहे?

अनेक वेळेला सांगितले, मला आदी अंत काही नाही. ॐ कारांचा कोणीतरी अंत घेतला आहे का? जे अखंड तत्व बहाल केले आहे, त्यात किती सेवेकरी रममाण झाले आहेत? एक एक तप झाले तरी, शंका रहित होत नाहीत. शंकेला डावलू शकत नाहीत. मग हा सेवेकरी कसला? असत कृतीचा खजिना सेवेकरी वाढवू लागला, तर माझा त्यात काही दोष आहे कां?

आसनाधीस्त काही गोष्टी गुप्त ठेवतात, त्या तुम्ही उघड करता. ज्यांनी मस्तकी हस्त ठेवला, त्यांचा शब्द कोणी मानला आहे का? एका तत्त्वाचे सेवेकरी, एका सद्गुरूची लेकरे असताना सेवेकऱ्यांची मने अजून गढूळ का आहेत? केव्हा शुद्ध होतील, त्यांचे ते जाणे. (पुढे सुरु….२) ©️

You cannot copy content of this page