Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

जो प्रत्यक्ष शिव आहे….©️

जो प्रत्यक्ष शिव आहे….©️

श्री स्वयंभू महाशिवरात्र – जे सत्यमेव आहे, स्वयं तत्त्व आहे, जो प्रत्यक्ष शिव आहे त्याचीच ही शिवरात्र आहे. तोच हा एक दिवस आहे. म्हणजे ज्यांची शिवरात्र आहे, त्यांच्याच ध्यानात मी रममाण असतो. मी जर शिव आहे, तर मग दुसऱ्याची सेवा का करतो? मी कोणाच्या ध्यानात असतो? तर जे स्वयं शिव आहेत, ज्यांचे वर्णन करता येत नाही, कोणी करू शकत नाही, कोणी केले नाही, असे ते महान तत्व आहे तेच माझे सद्गुरु आहेत. त्यांच्याच ध्यानात मी असतो. मी या ठिकाणी आलो तो आदेशाशिवाय कसा आलो? तुम्ही जरी कोणी नसलात, तरी मी सद्गुरू कृपेने पाहिले आहे. जर येथे कोणी नाही, तर या ठिकाणी येणे का व्हावे? इच्छा देतो कोण? तेव्हा या शुभ दिनी आपण संदेश देणे आणि ते जरूर मिळतील अशी आशा आहे.

श्री समर्थ मालिक यांचे शुभ संदेश – नाम हेच श्रेष्ठ आहे. नामातीत नामात सद्गुरु आहेत. आपण मानव जन्मात आहात. स्थूलात असेपर्यंत प्रत्यक्ष दर्शन घेणे. कर्तव्याप्रमाणे चालणे. नाम श्रेष्ठ आहे. महान सत्पुरुष नामानेच झाले. जिथे सत नाही असे ठिकाण आहे का? एकच संदेश, मानवात असल्यानंतर काहीना वाटते नामस्मरणास वेळ नाही. पण नामस्मरण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मला केलेच पाहिजे. दोन मिनिटे का होईना मी कर्तव्याचे पालन करीन. मी-तू, द्वेष भावना न ठेवणे. आपण एकच आहोत जन्माला घालणारा एकच व अंती नेणारा एकच, हि ठाम श्रद्धा ठेवणे. आपण ज्यावेळी शुद्धीकरण घ्याल त्यावेळी प्रथम संदेश, नंतर सर्वस्व कर्तव्य ! (समाप्त) ©️

You cannot copy content of this page