Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

आसन न्यायदानाचे, सतपदाचे ©️

आसन न्यायदानाचे, सतपदाचे ©️

मानवी सेवेकरी गृहस्थाश्रमी आहेत. मायावीत गुरफटलेले आहेत. माया ही सत पण आहे आणि असत पण आहे. सत मायेने गेल्यानंतर सत पदाला जातो. सत मायने वाटचाल केल्यानंतर अंतर्यामीने प्रेरणा दिली की तो पाहतो. हे साधल्यावर तन मन धन ही तिन्ही अंगे अर्पण करावी लागतात. तुमच्या भक्ती प्रमाणे जे रुजू करावयाचे, तोच हा महान दिवस आहे. ज्यांना साधले, सापडले, कळले ते महान सेवेकरी धन्य होत.

आजचे गुरुपद महान श्रेष्ठ पदाचे आहे.अनंत अवतार झाले. कार्याची सिद्धता साधली, पण आजचा हा दिवस न्यायदानाचा आहे. न्याय हक्काचा आहे. हे आसन न्यायदानाचे, सतपदाचे आसन आहे. हा दिवस फार महत्त्वाचा आहे. त्यासाठी सेवेकरी फार जपत असतात. या शुभ दिनी सद्गुरु मुखातून जे बोल निघतात, ते झेलण्यासाठी सेवेकरी धावत असतात. पण अखंड न्यायदानाचे आसन आणि त्या न्यायदानाच्या आसनावरच्या न्यायाला फार महत्त्व आहे. यावरूनच पुढच्या आढाव्याची गती घ्यावयाची असते. सर्वस्व गतीचा आराखडा याच शुभ दिनी तयार करण्यात येतो. वाल्मीकीने रामायण याच शुभदिनी रचिले. महाभारत सुद्धा याच शुभदिनी रचले म्हणून आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आजच्या या शुभदिनी जे महान बोल मिळाले, ते जतन करून ठेवणे सेवेकऱ्यांचे कर्तव्य आहे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page