Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

अखंड सेवा – २ -©️

अखंड सेवा – २ -©️

भक्तीला असे काही एक लागत नाही. लागते, पण एकच ! मनाची शुद्धता !! ती शुद्धता असल्यानंतर मन गढूळ करण्याची काय आवश्यकता? मनाच्या चाकोरीने अंगावरचे वस्त्र रंग देऊन भगवे करावयाचे असते, पण मुळात ते शुभ्रच असते. मग त्याला रंग चढविण्याची काय आवश्यकता? रंग तो कशाला? तर मानवाने त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी हे केलेले असते. भक्तीला सोंगं ढोंगं काही नको. मनाची भावना सत् शुद्ध ठेवली तरच त्या भक्तीचा उपयोग. मनुष्य हाच ईश्वर आहे. त्याच्याच अंत:र्यामी मानवात ते आहेत, जे ईश तत्व मानवाच्या अंत:र्यामी आहेत, त्याची ओळख करून घेणे. तोच ईश्वर आहे.संदेश – जे भक्तीसाठी अखंडत्व दिलेले आहे, त्याचा उजाळा करणे. सेवेकऱ्याने आपल्या स्वतःच्या कर्तव्याची काळजी वाहणे. सेवेकऱ्याने संशय रहित, कल्पना रहित होऊन आपले कर्तव्य करीत राहणे. हे सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. सेवेकर्‍यांनी आसनाधिस्तांना जास्त सतावणे बरे नाही. आसनाधिस्तांच्या आदेशाप्रमाणे सेवेकरी राहील तर त्याला काही कमी पडणार नाही. सेवेकऱ्याने ऐकायचे एका कानाने आणि सोडायचे दुसऱ्या कानाने अशी तऱ्हा आहे. ती होऊ देता कामा नये. (समाप्त)©️

You cannot copy content of this page