Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक –  महान महान योगी, महान तपश्चर्या केलेल्या ज्योती त्या पदाला गेलेल्या नाहीत, पण या सानिध्यातल्या ज्योती त्या पदाला गेलेल्या …

श्री समर्थ मालिक – प्रवचने कशासाठी आहेत? तर सेवेकर्‍यांनी सुधारण्यासाठी. नाहीतर त्याच्यासारखा अभागी तोच ! सताला लाघव करण्यास संधी न देणारे सेवेकरी …

श्री समर्थ मालिक – ज्ञान आत्तापर्यंत सर्वांना दिलेले आहे. कोणत्याही सेवेकऱ्यांना ज्ञान दिलेले नाही काय? ज्ञान आतापर्यंत मिळालेले नाही का? सेवेकऱ्यांना जे …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

|| भिन्न अभिन्नता कां? || ©️

|| भिन्न अभिन्नता कां? || ©️

श्री समर्थ मालिक –

मन म्हणजे माया. माया म्हणजे प्रकृती. ते बोल ओळखायला मिळतात, मग सेवेकरी अभिन्न का होत नाही? हेवेदावे, गटबाजी काय आहे हे? जीवाच्या जिवलगाप्रमाणे ह्यांचे एकमेकांशी वर्तन का असू नये? ज्या ठिकाणी मान अपमान आला, तो सेवेकरी सतात रममाण झाला आहे असे म्हणता येईल कां? त्यांने सताचे बोल ऐकले नाहीत असे म्हणावे कां?

मान अपमानाला जखडला की हेवेदावे निर्माण होतात. सत् बाजूला असते. ते सर्वस्व पाहत असतात. म्हणूनच म्हणतात, सेवेकरी सतात रममाण झाला नाही. जो सतात रममाण झाला, तो मायेचे बोल ओळखून गप्प बसतो. कारण मायेच्या बोलाला तो महत्त्व देत नाही. तो सताचे बोल ऐकण्यासाठी अधीर झालेला असतो. तो मान अपमान हे बघत नाही. तो मायेला जखडून राहत नाही. मनाच्या तरंगाने चालत नाही. म्हणून तो सेवेकरी सुखदुःखाच्या वेगळा असतो. पण असा जो सेवेकरी आहे त्याची मानव विटंबना करतात. तरी तो सेवेकरी कोणाकडेही पापणी वर करुन पहात नाही. संदेशांचे महत्त्व त्याला कळते. त्याप्रमाणे तो वाटचाल करतो. तो सेवेकरी मान अपमानाला जखडला आहे असे म्हणता येईल का? तर नाही. तो सेवेकरी सद्गुरु ध्यानात निमग्न झाला आहे नाही का? आताचे सेवेकरी सांगतात, प्रकृतीचे बोल ओळखतात. पण त्यांना मनाला थोडेसे सुद्धा बाजूला हटविता येत नाही. अभिन्न बनता येत नाही. असे का? ©️

You cannot copy content of this page