Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्ञान आत्तापर्यंत सर्वांना दिलेले आहे. कोणत्याही सेवेकऱ्यांना ज्ञान दिलेले नाही काय? ज्ञान आतापर्यंत मिळालेले नाही का? सेवेकऱ्यांना जे …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

ज्ञान दिलेले नाही कां?©️

ज्ञान दिलेले नाही कां?©️

श्री समर्थ मालिक – ज्ञान आत्तापर्यंत सर्वांना दिलेले आहे. कोणत्याही सेवेकऱ्यांना ज्ञान दिलेले नाही काय? ज्ञान आतापर्यंत मिळालेले नाही का? सेवेकऱ्यांना जे ज्ञान दिलेले आहे, ते त्यांनी जतन करून ठेवले आहे कां? सर्व सेवेकऱ्यांना विचारणे आहे, व्यक्तिशः कोणालाही नाही. सेवेकऱ्यांनी वाईट वाटून घेऊ नये.

ज्ञान जतन करून त्याची जपणूक राखली आहे का तर ते काही सांगता येत नाही. असे म्हणावे काय सेवेकऱ्यांना सांगता येत नाही म्हणून? सेवेकऱ्यांची मने जर शुद्ध स्फटिकासारखी असतील, तर आडमार्गी जाऊ शकतील काय? सेवेकरी संदेश डावलू शकेल का? आदेश डावलू शकेल? मने शुद्ध नाहीत, मग ती काहीही करतील. मन शुद्ध नाही, मनाच्या अशुद्धतेने गढूळ स्थिती असते. मनात नाना तर्‍हेच्या शंका कुशंका क्षणोक्षणी आणू लागला तर मग अशाना ज्ञान दिले का?

ज्ञान सर्वाना आहे पण सांभाळता येत नाही. त्या ज्ञानाची बूज राखली जात नाही. मग हे ज्ञान सांभाळायचे कोणी? या ज्ञानाची जपणूक कोणी करायची? याची व्यवस्था ठेवली तर त्याप्रमाणे मन ठेवले तर शुद्ध होऊ शकते. दिलेल्या ज्ञानामध्ये तल्लीन सेवेकरी आहेत काय? निमग्न आहेत काय? काय पहात आहेत? त्या ज्ञानाची जोपासना कोणत्या तऱ्हेने व कशी करावयाची? जे कधी अनुभवले नाही ते पाहायला मिळत आहे व प्रत्यक्ष पहात आहात तरी देखील ज्ञान घेतले आहे असे म्हणावे काय? ©️

You cannot copy content of this page