Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

नैतिक सत्य आणि भौतिक सत्य २ ©️

श्री विठ्ठल - सर्वस्व ओंकार सत्य आहे हे म्हणता येईल का? ओंकार सत्य आहे म्हणून हे सत्य आहे. मानव सर्वस्व आकारी आहेत. ओम स्वरूप आकारी आहे, पण ओंकार स्वरूप मानव बनला का? मानव तत्वरुप बनला तर हजारो व्याप करण्याची काय आवश्यकता? ज्यांना शरण आहे, त्यांचे आदेश तळ हातावर झेलले, तर ओंकार स्वरूप होऊ शकतो, पण…

Read More

नैतिक सत्य आणि भौतिक सत्य ©️

श्री विठ्ठल - नैतिक सत्य म्हणजे ते सतच आहे. सताला नैतिकही नाही आणि भौतिकही नाही. ते पूर्ण सत आहे. त्याला शुद्ध ही सारखे आणि अशुद्धही सारखेच आहे. चांगले वाईट त्याला सगळे समान आहे, असे ते सत्य आहे. नैतिक जे आहे ते आकारी आहे, म्हणजेच प्रकृती अंगाने ते नटलेले आहे. आपली नीतिमत्ता सांभाळून, सताचे पाठीमागे लागणारा…

Read More

जाण घ्या, त्या निर्मात्याची…©️

श्री समर्थ मालिक - मानव मनाने, अहंकाराने काहीतरी बोलतो, पण मुळातच त्याला तत्त्वाची म्हणा, माझी म्हणा गती नाही, तर पुढे तो काय सांगणार? मानवाची उत्पत्ती कोणी सांगितली आहे का? याची मूळ मेख मानवांना माहित नाही. मी व्यापक आहे ही जाण त्याला आहे. त्याला गती आहे, पण जाण त्याला नाही. तो काहीतरी बरळणारच! विद्येने पारंगत जरी…

Read More

संदेश – मालिक – ©️

श्री समर्थ मालिक - एकदा सेवेकरी झाला की सेवेकऱ्याचे घर हा सद्गुरु आश्रम आहे. कृती तशी फळे हा सिद्धांत आहे. सद्गुरु अंत:र्यामी असतात, पण कर्तव्य हे मन करीत असते. मनाचे अनुरोधाने केलेले कर्तव्य हेच कर्मसंचित आहे. तन, मन, धन…

Read More

समर्थ संदेश -३-©️

प्रकृती कोणाचे आधीन आहे? मन कोणाचे आधीन आहे? मनाला चेतना मिळते म्हणून ते बोलते. मनाला काही आहे की नाही? मनाला नाक, कान, डोळे, तोंड काही नाही ना? मग हे सर्वस्व मनाला आहे हे कोणाचे आधीन आहे? हे मनच अकरावे इंद्रिय आहे. याला शांत करण्याचा प्रयत्न करा. कोणी याला शांत करील? कोण याला शीतल करील? ती…

Read More

समर्थ संदेश -२-©️

या दरबारातील सेवेकर्‍यांची प्रकृती वेगवेगळी आहे, पण अंत:र्यामी तत्व एकच आहे, याची गती मिळाली आहे ना? सेवेकरी सत दृष्टीने, आदर भावनेने चालले आहेत का? ’ग’ची पीडा निर्माण झाली की एकमेकाबद्दल तिरस्कार वाटतो. ही ‘ग’ ची पीडा नष्ट करण्याचा प्रयत्न करा. पाठचा बंधू एखादे वेळेस…

Read More

समर्थ संदेश – ©️

श्री समर्थ मालिक - प्रत्येक सेवेकऱ्याच्या मागे अचाट शक्ती आहे ना? तिला जर रोज उजाळा दिला तर ती किती खुष राहील. ती शक्ती रममाण कशी होईल याची विवंचना केली मग कसलीही भीती नाही. ज्या ठिकाणी शांतता त्या ठिकाणी तत्व रममाण होते. त्या सताची शांती मिळाल्यानंतर…

Read More

आसन – ज्ञानेश्वर माऊली -©️

श्री संत ज्ञानेश्वर - समर्थ आसनाचे अधिकार सांगावयास माझी बालबुद्धी किती आहे, मला सुद्धा याची गती नाही, अंत नाही. आसन या तीन अक्षरांमध्ये काय ब्रम्हांड भरले आहे याचा अंत कोणालाही नाही अन कोणी लावलेला नाही. मी जरी ज्ञानाचा ईश्वर, सागर असलो तरीपण या आसनाचा ठाव घेता येणार नाही,…

Read More

मन स्थिर होण्यासाठी -३-©️

सूक्ष्म याचा अर्थ ज्योत ज्या स्थितीत जाते तीच धारणा होते. याला सूक्ष्म म्हणतात. म्हणून जे आपणाला मिळवावयाचे ते जडत्वापासूनच मिळते. स्थुल भक्तीच्या अनुसंधनाने भक्त सद्गुरुना डोळे भरून पाहू शकतो. स्थुलात जर सद्गुरु दर्शन मिळाले नाही तर सूक्ष्म निरर्थक आहे. म्हणून स्थुल श्रेष्ठ आहे. स्थुल हे स्थुलाच्या गतीने म्हणजे सद्गुरु गतीने वाटचाल करीत स्थिर होते. पण…

Read More

मन स्थिर होण्यासाठी -२- ©️

सत्संग असला तर त्यापासून सत् चाकोरी निर्माण होते. यावेळेला मनाला स्थिरता प्राप्त होते, ती कला अनुसरून त्याप्रमाणे वाटचाल करा. मनाला जेणेकरून स्थिरता प्राप्त होईल त्याप्रमाणे वागा ! ते मन कशाने स्थिर होईल? तर सत्संगाने ! ज्यापासून मनाला नेहमी स्थिरता प्राप्त होते, शांती मिळते त्याला सत्संग म्हणतात. मन व जड हे एकमेकांना बांधील आहेत. जडात बहात्तर…

Read More

मन स्थिर होण्यासाठी – ©️

श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज - मन स्थिर होण्यासाठी तू त्यागी रहा. जे काही भले बुरे केले असेल, ते मला अर्पण कर. मन हे संपूर्ण समर्थांना अर्पण झाले, तर ते कधीही अस्थिर राहणार नाही. मी कोणीही नाही, हे सर्वस्व समर्थ चरणांवर वाहिलेले आहे अशी निष्काम भावना पाहिजे. जीवात्मा जेव्हा शिवात्मा होतो त्यावेळेला तो निष्काम…

Read More

सतभक्त कसा पाहिजे ….©️

सतभक्ताने आपण एक समर्थांचा कण आहोत, असे समजून चालावे. आपण समर्थांचा सेवेकरी आहोत हे जाणून घेऊन, आपण कोणत्या ठिकाणी जावे, कसे राहावे, समर्थांच्या ठिकाणी लय व्हावे कि आणखी जन्म घ्यावेत याचे मनन, चिंतन करणे. सत मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे मानव जन्म हक्काने मिळेल. एका बीजापासून किती उत्पत्ती होते हे तुम्हाला माहित आहे. मुळात…

Read More

You cannot copy content of this page