Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

बोधामृत कसे चाखावयास मिळेल ?-२-©️

सत भक्तीसाठी प्रकृतीमध्ये एवढे स्नेह आहेत, ते सत चरणात निमग्न होऊन ओलावले असतील, तर एकाच ठिकाणी स्थीर राहतात. मन अमृतमय झालेले असते. रसना, प्रेम जर अमृतमय झाले, मग मन कोठे जाईल? जी इंद्रिये आहेत, ती सद्गुरुमय झाल्यानंतर इकडे तिकडे होतील का? भक्तीला प्रथम प्रेम पाहिजे. ते प्रेम शुद्ध असेल तर मन आकळता येते. स्नेह…

Read More

बोधामृत कसे चाखावयास मिळेल? ©️

श्री समर्थ मालिक म्हणताहेत, त्या अखंड सत् तत्वाची गती मिळवून दिली, त्या अखंड तत्त्वापासून कोणत्या रस्त्याने गेल्यानंतर काय होते, काय नाही, खरे किती, खोटे किती याचा सेवेकऱ्यांनी बोध घ्यावा. पण हे करताना त्या सेवेकऱ्याची कृती मात्र सत् पाहिजे. मी सत् किती करतो, असत किती करतो, याचे मायेत राहून सताचे घर्षण करणे, सानिध्य मिळविणे, त्याचा पूर्ण…

Read More

सेवेकरी चुकतो कां?-२-©️

आता इतकेच, काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळली आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण कोणत्याही स्थितीत शोधा-शोध केली, तर आपणास कळेल की, हे अखंड नाम कोणत्याही ठिकाणी दिले जात नाही. येथे सांगितले जाते, ते अनुभवातले सांगितले जाते. प्रत्यक्ष सहजासहजी विषय निघाला की त्याच्यावर प्रवचन…

Read More

मानव जन्माची स्थित्यंतरे -३-©️

रामदासांचे उदाहरण घ्या. रामदासांना थंडी वाजून आली, त्याच वेळेला शिवाजी महाराज त्यांना भेटावयास आले. रामदास स्वामी आसन सोडून बाजूला झाले. दोघे भेटत असताना, फक्त ते आसन हलू लागले. कापू लागले. शिवाजीला आश्चर्य वाटले. त्याने विचारले, “महाराज हे काय?” “हे प्रारब्ध आहे. आपण भेटायला आलात, आपले बोलणे, भाषण व्हावे म्हणून त्याला बाजूला ठेवले.” त्यांना ते…

Read More

सेवेकरी चकतो का? ©️

श्री समर्थ मालिक - सेवेकरी चकतो का? कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार नाहीत. जो सेवेकरी येथे ऐकतो व बाहेर गेल्यानंतर विसरतो, त्याला अनेक विवंचना निर्माण होतात व त्यातच तो गुरफटला जातो. खरोखरच येथील सेवेकऱ्यांजवळ एवढे अखंड तत्व सतत पाठीशी उभे असताना,…

Read More

नामाचा महिमा-२-©️

तुकाराम महाराज - “ब्रह्मानंदी लागली टाळी। कोण देहाते सांभाळी ।।’’ ही टाळी लागल्यानंतर नारायणाला शोधण्यास कोठेही जावे लागत नाही. स्वर्गात, मृत्यूलोकात कोठेही जावे लागत नाही, तर त्याचे अस्तित्व सतशुद्ध (चरणातच) अंत:करणात असते. त्याला शोधण्यासाठी सतशुद्ध आचरण ठेवले पाहिजे, मग अनंत लांब नाहीत. त्याचे साधन एकच हे नाम आहे. सतशुद्ध सात्विक आचरण आहे. अशा तऱ्हेने नाम…

Read More

नामाचा महिमा ©️

श्री संत तुकाराम महाराज - मी महान नाही. मी कोणत्या गतीने महान आहे. गती देणारा घेणारा फार वेगळा आहे. तो पांडुरंग फार वेगळा आहे. त्यांचा कोणीही अंत लावलेला नाही अगर लावू शकणार नाहीत. माझ्यासारख्या पामराला महान म्हणणे बरोबर नाही. जे महान आहे तेच ते पांडुरंग फार निराळे आहेत. प्रणव देणारे अन घेणारे तेच आहेत.…

Read More

पूर्णात पूर्ण असे परमनिधान-२-©️

श्री स्वयंभू - श्री हरि म्हणा, वासुदेव म्हणा, नमः शिवाय म्हणा, काही म्हणा हे सर्वस्व असले तरी, ते सर्वस्व एकाच चरणाजवळ लिन आहेत हे पाहणे आहे. सर्व देवाधिदेव श्रीहरी, महादेव कुठे लिन आहे तर एकाच चरणाजवळ ! तेच चरण जर सापडले तर तो महद भाग्यवान आहे. त्याच चरणांचे आपण सेवेकरी, दास, रज:कण आहोत. ते चरण…

Read More

पूर्णांत पूर्ण असे परमनिधान…©️

श्री स्वयंभू- महाशिवरात्र - पूर्णांत पूर्ण असे परमनिधान वेगळे आहे. मलाही पूर्ण म्हणता येणार नाही. पूर्ण जे आहे ते एकच आहे. अणू, रेणू, परमाणु याच्याही पलीकडे असणारे जे स्थान तेच पूर्ण आहे. त्यांनी जगताच्या कर्तव्यासाठी जी तत्वे निर्माण केली आहेत त्यातीलच मी एक तत्त्व आहे. हे सत्य आहे अन जे वेगळे, ते सत…

Read More

मानव जन्माची स्थित्यंतरे -२-©️

स्वर्गातील देव जे आहेत ते सुद्धा मानव जन्म मागतात. म्हणजे मानव देह किती मोलाचा आहे. मानव मनावर हे पटवून घेत नसल्यामुळे ही स्थित्यंतरे घडत असतात. अशातून पूर्व संचितानुसार ऋणानुबंधांच्या दृष्टीने जी सांगड घातलेली आहे अर्थात त्याला आपण दीक्षा म्हणतो, अनुग्रह म्हणून गणला जातो. ही जाणीव झाल्यानंतर त्याने बिलकुल विसरता कामा नये. ही जाणीव ठेवून ज्योत…

Read More

मानव जन्माची स्थित्यंतरे व शेवट –मालिक ©️

ज्योती जन्माला जेव्हा टाकतात, त्याचवेळेला त्याची सर्व व्यवस्था केली जाते. त्या ज्योतीला त्याची फिकीर नसते. मानव किंवा ती ज्योत वयात आली की, मायेत गुरफटते. त्या ज्योतीच्या कुटुंबात किंवा त्याच्या ठिकाणी कितीही ज्योती असल्या तरी ती मायेशिवाय राहत नाही. ज्योत जशी खेळकर होते, तस तसे ती मातेचे सुद्धा ऐकत नाही. खेळकर ज्योत आपल्या साथीदारांबरोबर बागडत असते.…

Read More

जडत्वाला जडत्वाची आवश्यकता असते – ©️

मालिक - प्रवचन भक्तीचे अंग फार न्यारे आहे. मी फार दूर नाही. आत्ताची प्रवचने जडत्वावर चाललेली आहेत. जडत्वाला जडत्वाची आवश्यकता असते, पण त्याच्या योगाप्रमाणे, त्याच्या संचिताप्रमाणे मिळणार. त्याचात तीळ मात्र शंका नाही. जर तो हात टेकू लागला तर घडेल किंवा नाही हे सांगता येणार नाही. याच्यात काही चूक नाही. मानवता पूर्ण समजली म्हणजे…

Read More

You cannot copy content of this page