मन स्थिर कसे राहील? जो सत्शिल, सतशुद्ध गतीने सद्गुरुंनी सांगितलेली चार तत्वे सांभाळून वाटचाल करेल, तर त्याचे मन स्थिर राहील.
हि चार तत्वे पुढीलप्रमाणे आहेत - (१) परधन आपले नव्हे (परधनाची अपेक्षा करु नये) (२) परस्त्री मातेसमान मानने (माता, भगिनी, भार्या) (३) मिथ्य (खोटे) बोलणे नाही (४) …
श्री बाबा - अखंड संपत्तीच्या ठिकाणी सुखही नाही आणि दुःखही नाही.
अखंड संपत्ती म्हणजे काय? अखंड ह्या शब्दाचा अर्थ ज्याला खंड नाही, खंडत्व नाही, खंडण नाही, ते अखंड ! येथे संपत्ती म्हणजे स्थावर-जंगम मालमत्ता नव्हे, तर सतपदाच्या आसनावरुन, सतपदाकडून अर्थात सद्गुरु मुखातून सत् भक्ताला मिळालेले अखंड नाम होय !
हे नाम कोणाचे? तर साक्षात…
दृश्याला दृश्याची आवश्यकता आहे. पण, प्रथम निष्काम गती पाहिजे. मी जरी काम करतो, काम करण्यासाठी मजूर लावतो, घरे बांधतो, दगड लावतो तरी हे माझे काही नाही. सर्वस्व भगवंताचे आहे. मी निमित्त मात्र आहे. इतकी जरी धारणा झाली, तरी गती निष्काम होते. मग सर्वस्व आपोआप जाग्यावर येते. पण निष्काम धारणा ठेवली पाहिजे.
याच्या उलट स्थिती…
श्री समर्थ मालिक एकचित्त - सेवेकरी ज्योत ज्यावेळेला एकचित्ताला तयार केली जाते, त्यावेळी अनेक वेळेला आदेश दिले, तरी ते कसे चकतात याचे आश्चर्य वाटते. प्रकाशमान सेवेकरी, प्रकाशाची संपूर्ण कल्पना दिली असताना सुद्धा चकतात, अनेक वेळा लाघवी तऱ्हा चंचलत्व निर्माण करते. चंचलतेचा भास निर्माण होतो, त्यावेळेला ताबडतोब एकचित्तता सोडणे, अगर आसनावर निवेदन करणे. मला कोणाचीही कसोटी…
नामाचा महिमा - या नामावर कोणतेही अस्त्र चालू शकत नाही. ज्याला मायेच्या वेष्टनातून पलीकडे जावयाचे आहे, ज्याला मायेचे बंधन तोडावयाचे आहे, त्याने ते नाम सद्गुरु मुखातून मिळविले पाहिजे. त्या नामाच्या अखंड ध्यानाने, ध्यासाने सद्गुरु दर्शन, सद्गुरूंचा ठाव मिळतो. त्याला कोणत्याही तऱ्हेची भीती नाही. नामाचा महिमा अगाध आहे. याची शक्ती फार बलाढ्य आहे. नाम मिळाल्यानंतर त्याला…
सेवेकरी म्हणतात कि, मालिक तुम्हीच करून घेणार आहात. पण हे तत्व कसे आहे कि, यात कोणीही मिलन होऊ शकणार नाही. सतमय जे आहे तेच सत् ! तेच ब्रह्म ! तेच समर्थ ! आपल्यातच आहेत. तेच आपणाला उपदेश सांगतात. म्हणून दिलेला अखंड नामाचा उजाळा करणे. पण ते कोणी करीत नाही.
स्थुलाला स्थुलाची जशी आवश्यकता आहे,…
बाबा – प्रारब्ध घडते ते मानवाच्या कृतीमुळे घडते. म्हणून आपल्या कृतीची फळे आपल्याला भोगायला लागतात. येणे नाम प्रारब्ध / संचित. म्हणून विचार सत पाहिजेत. सत् शुध्द गतीने गेले पाहिजे. कर्तव्य सत झाले तर इहात आणि परात पण शांती मिळेल.
संचित घडविणे तुमच्या अधीन आहे. मागे झाले ते झाले. पण आता सानिध्यात आल्यानंतर चांगली फळे…
आपले सद्गुरू कसे आहेत, ते कोणत्या रितीने सांगत आहेत, त्याचा अंत घेणे. या कुडीतून अविनाशी आत्मा बाहेर पडेपर्यंत त्यांना एकदा तरी डोळे भरून पाहणे. ज्यांनी पाहिले, अंत घेतला, तोच भाग्यवान होय.
अंत घेणे जितके कठीण, तितकेच ते सोपे आहे. आपला सेवेकरी वाममार्गी गेला, तरी सद्गुरु त्याच्यासाठी किती…
कपिल मुनी - आपले सेवेकरी मोठे आहेत. त्यांनी लहान मुलांप्रमाणे आंतून बाहेरुन शुद्ध होणे. जे आपले बोल, ते सतच काढणे. तो बोल झेपेल तसाच काढणे. काही मानव सेवेकरी जी गोष्ट नको, त्या गोष्टींकडे वळतात. कांहीना अन्न वस्त्र सुद्धा मिळत नाही. जे या बाबतीत श्रीमंत आहेत, ते अशा माणसांकडे लक्ष देत नाहीत. ते आपल्याच मायावी मी…
अलख - कोणाला सेवेकरी म्हणायचे? सेवा दिली तो सेवेकरी नव्हें ! तन, मन, धन एव्हढेच नव्हे, तर मनाच्या पलीकडचे जे चित्त ते सदगुरू चरणांवर अर्पण करावयाचे असते. असे ज्याने केले, तो सेवेकरी होय.
हा दरबार साधा नव्हें, दैवतांचा तर नव्हेच नव्हें आणि शक्तीचाही नव्हें अगर त्रिगुणात्मक सुद्धा नव्हें. त्या पलीकडचा हा दरबार आहे. …
एखाद्या सेवेकऱ्याचा अनुभव, आजच्या दर्शनाचे वर्णन, आजपर्यंत जी सेवा केली त्याचे प्रतिक, त्याचे दर्शन, वर्णन तेच प्रत्येक सेवेकऱ्याने ध्यानात घेऊन सदगुरु चरणांचा लाभ घेत घेत आपणाला कोणत्या ठिकाणी जावयाचे ते लक्षात ठेवणे.
प्रत्येक सेवेकऱ्याने, आपल्या सदगुरुंनी सत् पदाच्या आसनावरून जे अखंड नाम दिले आहे, त्याचेच नामस्मरण करने, त्यात निमग्न राहणे. आपले मालिक आपल्या पाठीवर…
श्री समर्थ मालिक – “समर्थाचिया सेवका वक्र पाहे | असा सर्व भूमंडळी कोण आहे ||जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||”
समर्थांचा जो सेवेकरी आहे, जो सत आहे, तो सत् मार्गाने जाण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याला समर्थांशिवाय, एकाच तत्त्वाशिवाय काही दिसत नाही, असा सेवेकरी अह:र्निश चरणात लिन झालेला असतो. त्याच्यावर शत्रु, चोर,…