Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

भावना निष्काम ठेवा ©️

रामदास, ज्ञानदेव हे निष्काम होते? त्यांची भावना निष्काम होती. पार्थाला सुद्धा भगवंताने सांगितले, “तू फक्त निमित्तासी कारण आहेस. तुझा हा सर्वस्व भ्रम आहे. तुला फक्त निमित्ताला उभे केले आहे. मारविता मीच आहे, ते कसे ते बघ.” लाघवी रूप धारण केले, दृश्य रूप प्रगट केले, पण त्याला पाहता येईना. त्यांनी त्याला धीर दिला. दिव्य दृष्टी दिली.…

Read More

श्रीराम नवमी-३-©️

त्यावेळी स्थूलांगी मारलेले अघोरी राक्षस आता स्थूल मानवांना त्रास देत आहेत. त्याचा पूर्णत्वाने नाश करणे हे कर्तव्य आहे. आसनाधीस्त पूर्णत्वाने हे जाणीत आहेत, पण आपण मानवी तऱ्हेने नाराजी पत्करू नये. संदेशाप्रमाणे सर्वस्व कर्तव्य होत आहे. पूर्ण झाल्यानंतर, मग पहा. उ:शापाचा काळ समीप आला आहे. मानवी शुद्धीकरण वाट पहात आहे.‌ त्याला एकदा गती मिळाली की…

Read More

श्रीराम नवमी -२-©️

या कोकणातील आसनाच्या कर्तव्याच्या बाबतीत आसनाधिस्त नाराज आहेत. पण त्यांना सांगणे आहे की, आपण बिलकुल नाराजी पत्करू नये. कर्तव्य करणारे, करून घेणारे फार निराळे आहेत. आपण फक्त देखभाल करीत राहणे. मी प्रत्यक्ष राम अवतारात असताना असेच केले आहे. मला ज्या ठिकाणी अडचणी आल्या, अडचणी निर्माण झाल्या त्या मी माझ्या सद्गुरूंना निवेदन केल्या. अन् त्यांच्या संदेशप्रमाणे…

Read More

श्रीराम नवमी – श्री समर्थ संदेश ©️

श्रीराम नवमी - श्री समर्थ संदेश – वेळोवेळी सत् पद या ठिकाणी संदेश देत आलेले आहेत व देतही आहेत. या पदाच्या आसनाचे कर्तव्य प्रगतिशील, उज्वल अन् भरभराटीचे आहे. आतापर्यंत ते अव्याहत, अवर्णनीय असे चाललेले आहे. पुढेही परम गतीने होणार आहे. माझ्या अवतार कार्याच्या वेळेस अघोरांचा स्थूलांगी नि:पात केला. त्याचेच शेष राहिलेले हे कार्य…

Read More

वालावल आश्रम नुतनीकरण ©️

वालावल आश्रम - एक पूजनीय स्थान, एक वंदनीय स्थान ! पूजनीय या अर्थाने की येथे आपल्या श्री सद्गुरु माऊलींच्या कलियुगातील या २६ व्या अवतार कार्याचा प्रारंभ झाला. वंदनीय यासाठी की येथे श्री गुरुदेव पितामह यांचा रामावतारातील आश्रम होता. आपणास कल्पना आहेच की श्री गुरुदेव पितामह म्हणजे, आपले श्री गुरुदेव वसिष्ठ ! रामावतारात श्रीरामांचे सद्गुरूपद…

Read More

ॐ कार, तोच आकार ©️

विठ्ठल - एकादशी या शब्दाचा अर्थ फार गहन आहे. या मायावी मानवांनी याचा अर्थ केलेला नाही, घेतलेलाही नाही. उपास करून एकाचा अंत मिळत नाही. एक म्हणजे व्यक्ती, म्हणजे आकार आला. एकातच रममाण झाल्यानंतर शून्याचा ठाव सापडू शकतो. एकाला धरूनच शून्याचा ठाव लागतो. एकाला धरले नाहीत तर शून्याचा ठाव सापडणे कठीण आहे. जो मूळ धरूनच वर…

Read More

सुख आणि दुःख ©️

मानवाने सुख आणि दुःख हे दोन विभाग केलेले आहेत. पण सुख कशाला आणि दुःख कशाला म्हटले आहे? कोट्याधीश हा सुखी आहे का? मग सुखी कोणाला म्हटले आहे? कोट्याधीश सुद्धा सुखी नाही. संपत्ती रेलचेल असली तरी तो दु:खी असतो. आणखी आणखी हे सारखे त्याच्या डोक्यात भरलेले असते. दुःखाची व्याख्या म्हणजे सदोदीत त्रास, काबाडकष्ट. ही दुःखाची व्याख्या…

Read More

मी नाही आकाशी -२-©️

सत चरणांचा अंत घ्या. चरण सापडले की पुढे वाटचाल आपोआप सुकर होईल. काही सेवेकऱ्यांना चरण सापडलेले नाहीत. चरण सापडले तर इतर कर्तव्यांची आवश्यकता काय? मग त्यांच्या लिलेचा अंत घेण्याची गरज काय? घेऊ म्हटले तर घेऊ देत. म्हणून पूर्वजन्मीच्या अनुसंधनाने कर्मसंचिताप्रमाणे कर्तव्याची घडण सत् तर आता ही सत् ! म्हणून पूर्व कर्माप्रमाणे घडण म्हणून या सानिध्यात…

Read More

मी नाही आकाशी, मी नाही पाताळी ! ©️

श्री समर्थ मालिक – मी नाही आकाशी, मी नाही पाताळी ! इतकेच की भक्त त्या पात्रतेचा असेल तर, निष्काम, परिपूर्ण, सत स्फटिकासारखी वर्तणूक असेल, तर मी त्या भक्ताला दूर नाही. आकाशीपण नाही आणि पाताळीपण नाही, तर मला सानिध्यात पाहता येईल, असे काही भक्तांनी सुद्धा सांगितले आहे. मी कोठे नाही असे ठिकाण नाही. इतकेच आहे की…

Read More

स्वयंभू कोण? ©️

श्री स्वयंभू – मी त्रिगुणातीत असणारे एक तत्व आहे अन् अखंड तत्त्वाचा सेवेकरी, त्यांच्या चरणाचा एक कण आहे. जे स्वयमेव तत्व आहे की ज्याला कधीही खंड नाही. त्याला रात्र नाही आणि दिवसही नाही. वेळ काळ काही नाही असे जे परम तत्व आहे, त्या तत्त्वाच्या चरणांजवळ मी एक कण आहे. त्रिगुण तत्वे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश…

Read More

दिसते ते नसते ©️

श्री समर्थ मालिक – दिसते ते नसते, अशी जर कल्पना असेल तर पुनर्रपी जन्माला कोण येते? पाच तत्वांचा हा देह आहे. मग नसते काय? अन् अमर राहते काय? हा दृश्य अदृश्याचा खेळ आहे. प्रकृती अंग नटवले तरी, प्रकृतीला कोणत्यातरी निमित्ताने मी त्यागतो. पण कोणाच्या प्रेरणेने, याची गती प्रकृतीला मिळत नाही. भक्ती मार्गाने ज्योत गेली तर…

Read More

You cannot copy content of this page