Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

अढळ श्रध्देचे फळ…..मालिक (२) ©️

भक्ती करणे दुरापास्त आहे. ती कोणाला ठसली जात नाही. ठसली तरी अडीअडचणी निर्माण होतात. पण पूर्वजन्मीचे गाठोडे असेल तर तो त्याची पर्वा करीत नाही. आपली चाकोरी सोडत नाही. हल्लीच्या परिस्थितीत गती मिळणे, चाकोरी मिळणे दुरापास्त झाले आहे. आयुष्य घालवेल पण सत्य परिस्थिती बाजूला राहीली. आपल्या येथे अजमावले जाते, सांगितले जाते, तसे कुठेही सांगितले…

Read More

अढळ श्रध्देचे फळ …..मालिक ©️

पूर्वी भक्तीला जरी त्रास होत असला तरी त्याला प्रतिसाद मिळण्याला बरीच मदत होत होती. हल्ली भक्ती करणारे फारच तुरळक आहेत. जरी असले तरी त्यांची निंदा नालस्ती होते आणि परिस्थिती ही प्रतिकूल आहे. पूर्वीपेक्षा हल्ली भक्ती साधी आणि सोपी आहे. तसे पूर्वी नव्हते. पूर्वी फार कसून घेतले जात असे. हल्ली तसे कसून घेतले जात नाही. …

Read More

पुण्यस्मरण दिन, सातारा आणि कोकण आश्रम भंडारा शुभदिन २०२४ ©️

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: ! गुरु: साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः !! ॐ नमोजी सद्गुरू परब्रह्म ! ॐ श्री गुरुदेव दत्त ! अशा श्री सद्गुरूंना समस्त गुरुबंधू भगिनींचे शतशः प्रणाम !! शुभ दिन म्हटले की भक्तांना एक पर्वणीच असते. मे महिना हा त्यातीलच एक खास मास ! या मासामध्ये आपल्या आश्रमाचे एकूण तीन कार्यक्रम…

Read More

आत्मबोध – भाग दोन ©️

म्हणून भक्ति कोणत्या अंगाने करावयास पाहिजे? सेवा कोणत्या अंगाने करावयास पाहिजे? हे मी सांगावयास पाहिजे का? प्रत्येक सेवेकऱ्याने याचे अंत:र्यामी शोधन करा. त्याप्रमाणे वाटचाल करा. पुढे सत् संचित, सत् सानिध्य लाभेल कसे याचा विचार करा. येथून पुढे असत संचित वाढवण्याचा प्रयत्न करू नये. आतापासूनच स्फटिका सारखा शुद्ध राहिला तर पुढे सत् सानिध्य त्याला लवकर मिळेल.…

Read More

आत्मबोध – मालकांचे प्रवचन ©️

आत्मा म्हणजे काय? तर, आत असणारी ज्योत, चैतन्य । जडत्वाच्या आत असणारे, चत्वार खाणीत असणारे, सर्व ठिकाणी आकाराच्या आत असणारे, स्वयमेव तत्व तोच आत्मा । त्याच्या प्रकाशाने वाटचाल करणे याचा बोध कोणी घेतला आहे कां? अकार व उकार या दोन्हींचा संवाद चालतो. तो बोध कोणी घेतला आहे का? जडत्वात स्वयमेव तत्व जर नसेल, तर…

Read More

सद्भावना, भाविकता….. ज्ञानेश्वर ©️

सद्भावनेने, भाविकतेने ज्या ज्योतीने जे बहाल केलेले आहे ते समाधीवर रुजू होणारच. पूर्ण श्रध्देने केलेले कार्य, कोणते कां असेना सद्गुरु चरणांवर रुजू होते. त्यामध्ये सद्भावना सतगती नसेल तर ते होणार नाही. मनुष्य हाच ईश्वरी अवतार आहे आणि त्यातच सर्वस्व बीजारोपण आहे, पण मानवाला त्याची जाणीव नसते. त्याची जाणीव होण्यासाठी मनुष्य देह आहे. प्रत्येक मनुष्य…

Read More

कृपा संपादन करण्यासाठी काय करावयास पाहिजे? ©️

सेवेकरी - आपली कृपा संपादन करण्यासाठी काय करावयास पाहिजे? ज्ञानेश्वर - काय करावयास पाहिजे म्हणजे ती गती मिळेल? ईश्वर ही चीज काय आहे याची अद्याप जाणीव घेतली नाही. चैतन्य शोधण्यासाठी कोणाचा तरी हात धरावा लागतो. काठी निर्माण करावी लागते. ती काठी धरून तिथपर्यंत जावे लागते. मानवी अवताराचे मर्म यातच आहे. ते मिळाले की मग वेळच…

Read More

मंत्र सिद्धी – गोरक्षनाथ (२) ©️

हल्लीचा मानव, त्याच्याजवळ थोडे जरी काही असले की त्याला अभिमान निर्माण होतो. विशेष आहे असे त्याला वाटत असते. पण याचे खंडन करणारा कोणीतरी आहे की नाही याची गती त्याला मिळत नाही. हे विशेष काही नसून मरणाचे घर आहे, असे मला वाटते. हे ज्याच्या जवळ असते त्याला नरक कुंडाची गती मिळाल्याशिवाय राहत नाही. हे अघोर मानव…

Read More

मंत्र सिद्धी – गोरक्षनाथ ©️

“मंत्र म्हणजे मन त्रयीत लय करणे – येणे नाम मंत्र !” मन त्रयीत लय झाले म्हणजे मंत्राची सिध्दी होते. पण त्यालाही समर्थांचे सहाय्य लागते. सद्गुरू शिवाय मन त्रयीत लय करणारे कोणीही नाही. मन त्रयीत लय झाले तरच ते सिध्द होते. त्याला ओंकार बीज लागते. त्याशिवाय मंत्राची पूर्ती नाही. मंत्र म्हणजे काय? त्याचे माहेरघर हेच समर्थ…

Read More

परमात्म्याशी एकरूपता एकलयता कशी साधावी? …. प.पू. श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज ©️

जीव आणि ब्रह्म - सेवेकरी कोणत्या स्थितीत असतो? तर जीव स्थितीत. सद्गुरु कोणत्या स्थितीत असतात? तर परब्रह्म स्थितीत ! जीव येणे आत्मा येणे नाम जीवात्मा. जीव आत्मस्थितीत असणे म्हणजेच जीवात्मा स्थितीत असणे होय. सद्गुरु परब्रह्म स्थितीत असतात. जीवात्मा शिवात्मा स्थितीत म्हणजे परब्रह्म स्थितीत एकात्म, एकरूप, एकलय झाल्याखेरीज परब्रह्म अथवा सद्गुरूंची दर्शन स्थिती प्राप्त होत नाही.…

Read More

सांभाळी कनक आणि कांता! ©️

स्थुलाला स्थुलाची आवश्यकता आहे. सत् आहे. स्थुल हे माया रहीत नाही. पण माये मध्ये दोन शाखा आहेत – १) सत् आणि २) असत ! मानव धनाला भुलतो. पण ज्याने कनक आणि कांता सांभाळली तोच मोक्षाचे मार्गाने जाऊ शकतो. संतांनी सांगितले, धन म्हणजे संपत्ती ! मग स्थावर असो वा जंगम असो. म्हणून सेवेकर्‍यांनी…

Read More

You cannot copy content of this page