ज्या भक्ताला चमत्कार पाहिजेत, नाव पाहिजे, लोकांनी मानले पाहिजे, मी कोणीतरी आहे अशी ज्यांची भावना असते, महान साधू आहेत, त्याने जर चमत्कार दाखविले, तर हा कोणीतरी महान योगी आहे असे मानव म्हणतात.
पण मानवांना अद्याप कळलेले नाही, जो वाटेल त्या परिस्थितीत आपली सत् चाकोरी ढळू देत नाही, त्यालाच महान सत्पुरुष म्हटलेले आहे. त्याला सत…
कर्मयोग - कर्मयोगातल्या शाखा दोन आहेत – एक सत् आणि एक असत ! विचारणा होते आहे, आनंदाची गोष्ट आहे. संतांनी लिखाण करून ठेविले आहे – सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वां मुखी मंगल बोलवावे !
सध्याच्या युगात कोणी सेवेकरी असा झाला आहे का? भारतातील सर्व मानव सत्कर्म योगाने युक्त असते तर, भारताची ही स्थिती झाली…
सेवेकऱ्याने अंत:र्दृष्टीने पाहिल्यानंतर जी पाच तत्वे आहेत, ती निराकारी आहेत हे कळू लागते, मग ही पाच तत्वे आहेत, ती आकारी कशी केली? आणि कशासाठी केली? या पाच तत्वांचा एक आकार जमवून, त्या आकाराच्या आत निराकार बसले आहेत आणि आतल्या आत चुपचाप पाहत असतात. आकारी पिंजरा निराकारी केव्हा होतो? तेच सद्गुरु अविनाशी तत्व बाहेर पडल्यानंतर, आकारी…
श्री समर्थ मालिक – आपण सर्वस्व चरणांवर वाहिल्यानंतर हे कार्य कसे होईल हे विचार आपल्या मनात यावेत तरी कशाला? आपण सद्गुरु चरणात लिन झालो आहोत, रममाण झालो आहोत, मग बाकीच्या इतर गोष्टी मालिक करून घेणार नाहीत का?
सद्गुरूंच्या ठिकाणी पूर्णत्वाने लीन झाल्यावर सद्गुरु आपोआप मार्ग दाखवतात. म्हणजे सर्वस्व कार्य सिद्ध होत असते. सद्गुरु म्हणजे…
ती नामाने अखंड भरली म्हणजे सर्व ठिकाणी प्रकाश फाकेल. मग कोणत्याही बाबतीत सेवेकऱ्यांना न्यूनता भासणार नाही. पण, तितकी तयारी झाली पाहिजे.
पूर्वीच्या युगात महान महान सेवेकरी होते. ते अखंड सेवेत, गतीत निमग्न झाले, सेवामय झाले, भक्तीमय झाले. त्याप्रमाणे आताच्या युगात कोणी दिसत नाही. आहे कोणी असा की ज्याची तिजोरी भरून वाहत चालली आहे. अखंड…
अखंड सेवा – अखंड सेवा ही दिलेलीच असते. परत मागण्याची जरुरी नसते. ती दिलेली असते. सेवेकऱ्यांना ती टिकविता येत नाही, म्हणून त्यांना असे वाटते आणि जरी नसेल, तरी मालिक, सद्गुरु हे देतातच. दिलेल्या प्रमाणे सेवेकऱ्याने ती सेवा टिकविली पाहिजे. अखंड सेवा दिली आहे, पण त्या अखंडत्वाचा उपभोग घेता आला पाहिजे. ज्याला कधीही खंड नाही, असे…
धर्मो रक्षति रक्षित: || अधर्मावर धर्माचा विजय, अंध:कारावर उष:कालाची मात || विजयादशमीच्या अर्थात दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
साधु संत येती घरा, तोची दिवाळी-दसरा ! असे म्हटले जाते. खरंय का हो? आजकाल साधु संत आपणांस पहायला मिळतात कां? ह्याचे उत्तर ज्याचे त्याने शोधावे. हे जरी खरे असले तरी आज भारतीय कालगणनेनुसार दसरा आहे. आपणांस सीमोल्लंघन केले पाहिजे,…
परम् पूज्य श्री बाबा – प्रारब्ध घडते ते मानवाच्या कृतीमुळे घडते, म्हणून आपल्या कृतीची फळे आपल्याला भोगायला लागतात, येणे नाम प्रारब्ध/संचित. म्हणून आपले विचार कसे पाहिजेत? तर सत पाहिजेत. सत् शुध्द गतीने गेले पाहिजे. कर्तव्य सत झाले तर इहात आणि परात पण शांती मिळेल.
संचित घडविणे तुमच्या आधीन आहे. मागे झाले ते झाले, पण…
अनेक वेळेला सांगितले आहे, ज्योतीर्मय शुभ्र शांत वर्तुळातून आंत जायचे. असे असताना सुद्धा सेवेकरी चकतात. लाघवी तऱ्हा कुठपर्यंत असते. अनेक वेळा सांगितले, दहाव्या द्वारापासून अकराव्या द्वारापर्यंत लाघवीचे खेळ होतात. पुढे लाघवीला गती नाही. सेवेकऱ्यांना अनेक वेळेला सांगितले, शुध्द शुभ्र स्फटीकासारखे वर्तुळ आहे, त्यामध्ये गेले म्हणजे स्थिरत्व प्राप्त होते. प्रकाशाची गती घेताना, प्रकाशाची जाणीव घ्यावयाची. मात्र…
ज्ञानेश्वर - काय करावयास पाहिजे म्हणजे ती गती मिळेल?
ईश्वर ही चीज काय आहे याची आपण अद्याप जाणीव घेतली नाही. चैतन्य शोधण्यासाठी कोणाचा तरी हात धरावा लागतो. काठी निर्माण करावी लागते. ती काठी धरून तिथपर्यंत जावे लागते.
मानवी अवताराचे मर्म यातच आहे. ते मिळाले की, मग वेळच नाही. ते मिळविण्यासाठीच आपण जन्माला आलेलो…
सद्भावनेने, भाविकतेने ज्योतीने बहाल केलेले कार्य समाधीवर रुजू होणारच. पूर्ण श्रध्देने केलेले कार्य कोणते कां असेना रुजू होते. त्या कार्यामध्ये सद्भावना, सद्गती नसेल तर ते होणार नाही.
मनुष्य हाच ईश्वरी अवतार आहे आणि त्यातच सर्वस्व बीजारोपण आहे, पण मानवाला त्याची जाणीव नसते. त्याची जाणीव होण्यासाठी मनुष्य देह आहे. प्रत्येक मनुष्य हा कोणाचा अवतार आहे…
सद्गुरु पदाचा महिमा अगाध आहे. ज्याला जे दिले, त्याचा तो अमृततुल्य ठेवा कोणीही हिरावून घेणार नाही. सेवेकरी आपल्या कृतीस क्षणीक चुकत असेल, तर ती ठेव कृतीप्रमाने कमी कमी होत जाते. ज्याप्रमाणे अकार, उकार, ओंकार याची कोणतीही स्थिती रहात नाही, त्याप्रमाणे तो आपण स्वतःकडून सद्गुरु चरणांवर अर्पण करतो.
सद्भावनेने, सत् आचरणाने जो सद्गुरू ठेवा जतन…