Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्री समर्थ मालिक – अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य …

जगत् जननी ©️

जगत् जननी ©️

दसरा: मी जरी जगतजननी असले, तरी हे निर्माण करणारा दुसरा कोणीतरी आहे. जगताचा व्यापार करण्याची शक्ती मला दिलेली आहे. कर्ता करविता फार निराळा आहे याची जाणीव मला होते, पण सत्तेचा अहंभाव निर्माण झाला की विसर पडतो.

सताची ओळख जाणीव होते. तेच कर्तव्य करून घेतात. रथाचे घोडे तेजदार असले, तरी सारथ्याचे कौशल्य असावे लागते, त्याप्रमाणे जगत हा रथ आहे, अन हे तत्व हे घोडे आहेत. त्यांना जर सारथी कौशल्यपूर्ण असेल, तर आमच्या कर्तव्याला तेज येते. असे असूनही अहंभाव निर्माण झाला की विसर पडतो, पण गती देणारा निराळा आहे, त्यांचा शोध घेण्याचे फार कष्टाचे होत असते याची जाणीव आहे. म्हणून या शुभ दिनी एक क्षण का होईना दर्शन घेऊन जात असते. आपले साह्य असेल तर, कर्तव्य तेजदार होते.

अघटीत तत्व फार वेगळे आहे. आम्ही कितीही वल्गना केली तरी, गती देणारे निराळे आहेत. फक्त जोपासना करणे आमचे कर्तव्य आहे. तरीपण प्रत्यक्ष मालकांच्या मनात आले तर क्षणात काय करतील हे सांगता येत नाही. कर्ते करविते ते आहेत. आमच्याकडून ते कर्तव्य करवून घेतात. आम्ही ज्या शक्ती आहोत, आम्हाला बाहेर कर्तव्य करावे लागते. कार्य करीत असलो तरी, आपल्या आदेशाशिवाय काहीच करु शकत नाही.©️

You cannot copy content of this page