हे आसन तीन ताळ, सप्त पाताळ, एकवीस स्वर्ग सर्व ठिकाणी आहे. येथून सुटलेले आदेश कोठे जातात? कोठे घुमतात? याचा ज्याला अनुभव घ्यावयाचा असेल, त्याने आपल्या शक्तीने प्रयत्न करावा. कोणत्या कारणाने आपण या दरबारात आलो याचा प्रत्येकाने शोध लावावा.
आसनाधिस्त कोण आहेत? कोणत्या ठिकाणीं आहेत? कसे आहेत? याचा…
आसन म्हणजे साधी सुधी गोष्ट नव्हे. आसनाला अधिकार काय आहेत? कोणी दिधले? कशाकरीता दिले? याचा सेवेकऱ्यानी अंत लावला आहे का? या दरबारातील प्रत्येक ज्योत प्रकाशित आहे. फक्त संचिताप्रमाणे, पूर्व कर्माप्रमाणे वाणीने व ओघाने फळ प्राप्त झाले आहे.
या दरबारात, सानिध्यात येण्याला पूर्व जन्मिचा ठेवा लागतो. प्रत्येक अणु रेणू चत्वार खाणीत ह्या दरबाराची व्याप्ती आहे. सर्व…
अक्षय मुनी
मायेच्या जाळ्यात गुरफटणाऱ्याला, अखंड दर्शन नाही. ते जाळे तोडून गेल्यानंतरच दर्शनाचा लाभ मिळेल.
माया ही अमोल चीज आहे. जो मायावी जाळ्यात पूर्णपणे जखडून गेला, तो त्यातून केव्हाही सुटणे शक्य नाही. जो हे जाळे तोडून सद्गुरु शोधासाठी धावला, त्याला सद्गुरु दूर नाहीत.
मायेचा अंत, मायेचा ठाव, कुठपर्यंत आहे, हे ज्याला कळले तोच सद्गुरुंचा ठाव…
मानव षड्रिपूच्या जाळ्यात गुरफटला असला तरी ते तोडण्याचे सामर्थ्य आपल्या सद्गुरुं मध्ये आहे. त्यांचे बोल झेलणे हीच सहज स्थिती आहे. त्याचा ठेवा करून ठेवता ठेवता तो सदगुरुं जवळ येतो. मग सत् भक्ती बीजारोपण नंतर सद्गुरूंची ओळख, नंतर सत् शोधण्यासाठी आपल्या सद्गुरुंचा आदेश. बोल साधा, पण सहज गतीने निघालेला असतो. सद्गुरूंच्या मनात आल्यानंतर ते कोणालाही, केव्हाही…
ज्याला आदेश पटले, तो सर्वस्व आपल्या सद्गुरु चरणांवर अर्पण करतो, त्यालाच आदेशाची किंमत व ओळख असते. आदेशाची प्रत्येक सेवेकरी वाट पाहत असतात. पुढच्या दरबारात आदेशावर आणखी प्रवचन होईल.
“आदेश” म्हटल्या नंतर त्याचा ध्वनी दुंदुभी त्रिभुवना सहित २१ स्वर्ग, व सप्त पाताळ या ठिकाणी घुमतो. हे सेवेकऱ्याना माहित नाही काय? ओळख करून घेतली असे म्हटले तर…
आदेशावर आतापर्यंत तीन दरबारात प्रवचन झाले. एवढे असूनही दरबाराचे व आदेशाचे महत्व राखले जात नाही याबद्दल खेद वाटतो. आदेश म्हटल्यानंतर आदेश कोठून आला? त्याची जाणीव घेण्यासाठी तीन ताळ, सप्त पाताळ, एकवीस स्वर्ग, चत्वार खाणी यांच्यातील प्रत्येक ज्योत आदेश कोठून आला, त्याची जाणीव घेते. आदेश हा ध्वनी उमटल्यानंतर, घुमल्यानंतर ज्या समाधीत ज्योती आहेत, त्या खडबडून जाग्या…
आदेश - आपल्या सेवेकऱ्यानी प्रत्यक्ष यावर पाहणी करावी. आसनावरून आदेश सुटल्यानंतर किती ठिकाणी, कोणत्या तऱ्हेने, कोणत्या तत्वाने, तो कुठे कुठे घुमत असतो याची जाणीव घ्यावी.
(तो आदेश) चराचर, परात्पर सर्वत्र घुमतो. आसनावरून आदेश सुटल्यानंतर तो आदेश कोणाला आहे, मग तो समाधीत असो, अगर कोणत्याही उपाधीत असो, याची जाणीव घेऊन, एका क्षणात दरबारात खडे होतात. सेवेकऱ्यांचे…
कर्तव्याची फळे आपोआप मिळणार आहेत. कर्तव्य कितीही कठोर व कठीण असेल, तरी त्याचे फळ आपणास पूर्णपणे मिळणार आहे. दरबार हा उज्वल स्थितीत चालला असताना सेवेकरी हा सेवेकरीच असावा लागतो.
या दरबारचा सेवेकरी सत् शिष्य असतो. हे अजमावयाचे असते. कितीही लाघव झाले, ह्या दरबारचा सेवेकरी भीत नाही. त्याला…
सत् मार्गाने, सत् आचरणाने, सत् भक्ती युक्त अंत:करणाने ते तन काढून टाकावयास पाहिजेत. मनाची शुद्धता झाल्यानंतर सत् मार्ग दिसतो. अशा तऱ्हेने जो जातो, तिच सहज समाधी होय.
असा सर्वांग परिपूर्ण जो होतो, त्याला नेहमी सत् दिसते. पाहता येते. तेच सत्, तेच बीज, त्याचेच बीजारोपण करायचे असते. अशा तऱ्हेने…
दैविक शक्ती पेक्षा मनाची शक्ती फार मोठी आहे. कर्तव्य करीत रहा. फळ देणे घेणे स्वतःच्या आधीन नाही. केव्हां मिळेल याचा थांग लागणार नाही. उपाधी निर्माण होते. त्यावेळी नामाचा जो अमूल्य पेला आहे तो घेत रहा. निसर्गाला सुद्धा नियम आहे. प्रसंगाच्या वेळी मात्र मालिक आठवतात. इतर वेळी मालिक कोठे असतात? आताच या ठिकाणी सांगितले आहे, आपल्याकडे…
- श्री कण्व मुनी -
सत् सेवेकऱ्यांच्या ठिकाणी सुडाची भावना कधीही नसावी. या उलट अघोरांकडे ती असते.
सत् शिष्य म्हणजे ज्याच्या ठिकाणी प्रज्ञाशिलता व समता असते तो होय.
कितीही श्रेष्ठ सेवेकरी असेल, पण यत्किंचीत तमोगुण त्याचे जवळ असेल, तर त्याची किंमत मालकांजवळ नसते.
सेवेकरी दरिद्री असो, कसाही असो पण पूर्णांगी सत् असेल तर मालिक त्याच्यासाठी…
मनू + ईष म्हणजेच मनुष्य ! मनुष्य हाच ईश्वर आहे. दुसरे ईश्वर कोण आहेत? ३३ कोटी दैवते काही काळाच्या पाठीमागे, मानवातच व्यवहार करीत होती. तेच दैवत बनले. ती चित् घन वस्तू ज्याला रूप नाही, रंग नाही, आकार विकार काही नाही, अशांचे वर्णन कोण करू शकणार?
परब्रम्ह शक्ती सर्व ठिकाणी - स्वर्ग मृत्यू पाताळात वावरते. ती…