सेवेकरी - आपली कृपा संपादन करण्यासाठी काय करावयास पाहिजे? ज्ञानेश्वर - काय करावयास पाहिजे म्हणजे ती गती मिळेल? ईश्वर ही चीज काय आहे याची अद्याप जाणीव घेतली नाही. चैतन्य शोधण्यासाठी कोणाचा तरी हात धरावा लागतो. काठी निर्माण करावी लागते. ती काठी धरून तिथपर्यंत जावे लागते. मानवी अवताराचे मर्म यातच आहे. ते मिळाले की मग वेळच…
हल्लीचा मानव, त्याच्याजवळ थोडे जरी काही असले की त्याला अभिमान निर्माण होतो. विशेष आहे असे त्याला वाटत असते. पण याचे खंडन करणारा कोणीतरी आहे की नाही याची गती त्याला मिळत नाही. हे विशेष काही नसून मरणाचे घर आहे, असे मला वाटते. हे ज्याच्या जवळ असते त्याला नरक कुंडाची गती मिळाल्याशिवाय राहत नाही. हे अघोर मानव…
“मंत्र म्हणजे मन त्रयीत लय करणे – येणे नाम मंत्र !” मन त्रयीत लय झाले म्हणजे मंत्राची सिध्दी होते. पण त्यालाही समर्थांचे सहाय्य लागते. सद्गुरू शिवाय मन त्रयीत लय करणारे कोणीही नाही. मन त्रयीत लय झाले तरच ते सिध्द होते. त्याला ओंकार बीज लागते. त्याशिवाय मंत्राची पूर्ती नाही.
मंत्र म्हणजे काय? त्याचे माहेरघर हेच समर्थ…
जीव आणि ब्रह्म - सेवेकरी कोणत्या स्थितीत असतो? तर जीव स्थितीत. सद्गुरु कोणत्या स्थितीत असतात? तर परब्रह्म स्थितीत ! जीव येणे आत्मा येणे नाम जीवात्मा. जीव आत्मस्थितीत असणे म्हणजेच जीवात्मा स्थितीत असणे होय. सद्गुरु परब्रह्म स्थितीत असतात. जीवात्मा शिवात्मा स्थितीत म्हणजे परब्रह्म स्थितीत एकात्म, एकरूप, एकलय झाल्याखेरीज परब्रह्म अथवा सद्गुरूंची दर्शन स्थिती प्राप्त होत नाही.…
स्थुलाला स्थुलाची आवश्यकता आहे. सत् आहे. स्थुल हे माया रहीत नाही. पण माये मध्ये दोन शाखा आहेत – १) सत् आणि २) असत !
मानव धनाला भुलतो. पण ज्याने कनक आणि कांता सांभाळली तोच मोक्षाचे मार्गाने जाऊ शकतो. संतांनी सांगितले, धन म्हणजे संपत्ती ! मग स्थावर असो वा जंगम असो. म्हणून सेवेकर्यांनी…
रुप, रस, गंध, बोल किंवा शब्द व स्पर्श हे जरी वेगवेगळे विषय असले, तरी ते विषय न राहता विकार ह्या अर्थी भक्तिमार्गात वापरले जातात.
आपणांस कल्पना आहेच की विकार म्हटले कि मानव हा त्यात भरडला जातो, भरकटला जातो. विकार किंवा विषय हे एखाद्या रोगासारखे असतात. त्यांचा परिणाम मानवांवर झाला की मानवाचे कोटकल्याण न होता, तो…
“विषय तो माझा झाला नारायण”
विषय हे पाच आहेत – बोल, स्पर्श, रूप, रस आणि गंध ! बोल या विषयामध्ये हरण हा मृत्यू पावला आहे. स्पर्श या विषयामध्ये हत्ती मृत्यू पावला आहे. रूप या विषयांमध्ये पतंग मृत्यू पावला आहे. रस या विषयांमध्ये मासा मृत्यू पावला आहे आणि गंध या विषयांमध्ये भ्रमर मृत्यू पावला आहे.…
हे धन कधीही उच्च पातळीला भिडविणारे नाही. म्हणून धनलोभी होऊ नका. धन पाहिजे, पण फक्त व्यवहारासाठी. धनासाठी सेवेकरी लांड्यालबाड्या करतात, पण ते योग्य नव्हे.
धनाचा योग्य तऱ्हेने वापर केल्यास, समर्थ कमी पडू देणार नाहीत. समर्थ सांगतात, ते दूरवर विचार करून सांगतात. अशा तऱ्हेने जो वागेल, त्याला समर्थ काहीही कमी पडू देणार नाहीत.
जडाला, स्थुलाला…
कालचेच उदाहरण घ्या, “एका दरबारात दिलेले प्रणव, दुसऱ्या दरबारात फिरवितो.” हे दोघांचे चाललेले होते. दोघेही सताचे सेवेकरी. एका कपात चहा पिणारे. पण दोघेही एकमेकांच्या डोक्यावर ठेवतात. यांना शांती कुठून द्यावयाची? पण धनासाठी लबाडी करणारे, यांना कधी शांती मिळेल कां?
आपण शांततेने झोप घेता, पण धनवानाला शांत तऱ्हेने झोप येत नाही. ती अघोर माणसे समजा.…
कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच ! कोळसा जर तेजाळत नाही तर त्याला किती उगाळणार?
तेव्हा दृश्य तेजाळले पाहिजे. कोणत्याही चाकोरीत फेकले तर विचार उच्च कोटीचे पाहिजेत. उच्च पातळीचे विचार नसतील तर दृश्याची काहीच किंमत नाही. गल्लीबोळात फिरणाऱ्या कुत्र्यासारखी त्याची अवस्था असते.
समर्थांनी सांगितले आहे की, "त्रिभुवनात किती फुले फुलतात, पण ठराविकच माझ्या…
आपणच आपल्या कृतीप्रमाणे देव व दानव बनतो. दानव काही निराळे नाहीत. दानव म्हणजे अहंकारयुक्त, आचार विचार नाही अशी बुद्धीहीन ज्योत होय.
स्थुलाचे बुद्धी हे भांडवल आहे, पण ती बुद्धी तेजाळलेली पाहिजे, धुरकटलेली, बुरसटलेली नको. तिला सत् शुद्ध विचारांची पावडर मारली पाहिजे. सत् शुद्ध विचारांचे घर्षण झाले तर ती तेजाळलेली राहील.
सगळ्यांचा मदमेरू मन आहे.…
आपण जे पाहतो, ओळखतो, देवाण-घेवाण करतो, मायेने व्यवहार होतो. ही सर्व दृश्य दृश्यांची गती आहे. दृश्याला याची आवश्यकता आहे. जो आत वास करतो कि ज्याच्यामुळे आपण युक्ती लढवतो, पैसा मिळवतो, त्याला विसरुन हे धन माझे आहे असे म्हणतो. चांगल्या तऱ्हेने अगर वाईट मार्गाने सुद्धा धन मिळवितो, पण त्याला पूर्णत्वाने जाणीव असते की मी कोणत्या तऱ्हेने…