Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्रीराम नवमी संदेश (२) ©️

श्रीराम नवमी संदेश (२) ©️

या कोकणातील आसनाच्या कर्तव्याच्या बाबतीत आसनाधिस्त नाराज आहेत. पण त्यांना सांगणे आहे की, आपण बिलकुल नाराजी पत्करू नये. कर्तव्य करणारे, करून घेणारे फार निराळे आहेत. आपण फक्त देखभाल करीत राहणे. मी प्रत्यक्ष राम अवतारात असताना असेच केले आहे. मला ज्या ठिकाणी अडचणी आल्या, अडचणी निर्माण झाल्या त्या मी माझ्या सद्गुरूंना निवेदन केल्या. अन् त्यांच्या संदेशप्रमाणे कर्तव्य परायणता साधून सर्वस्व कर्तव्य रेटत नेले.

मुंबई आणि सातारा येथे कोणती गती झाली याची आपणाला जाणीव आहे. तद्वतच तशी तऱ्हा आता कोकणात चालली आहे. पण लक्षात ठेवा, अखेर विजय सताचाच असतो. मुंबई व सातारा या ठिकाणी विचित्र तऱ्हा निर्माण झाली होती. पण अखेर सताचाच विजय झाला. हे संदेश आपण कोकणातील सेवेकऱ्यांना देणे. पण नाराजी पत्करू नये. पुढे काय होत आहे हे प्रत्यक्ष पहा.

मी अनंत रूपे, अनंत नामाने नटलेलो आहे. माझा अंत:पार कोणालाही नाही. परंतु मी प्रत्यक्ष मृत्यू गोलार्धात जगदोध्दारासाठी जरी अवतार घेतला म्हणून सताची पिछेहाट झाली का? हेच ओळखून कर्तव्य जोमाने आणि धीराने रेटीत चला. यश अखेर तुमचेच आहे.

हल्ली महान तऱ्हेचे शुद्धीकरण चालू आहे. त्यामध्ये आसनाधिस्त नाराज होतात, पण पहा, आमच्या अवतार कार्याच्या वेळी प्रत्यक्ष स्थूलांगी समोरा समोर लढाई होत होती, पण नाराजी न पत्करता आम्ही आमचे कर्तव्य म्हणून झगडत होतो. आता तेच कार्य या ठिकाणी होत आहे. त्यावेळी स्थूलांगी मारलेले अघोरी राक्षस आता स्थूल मानवाला त्रास देत आहेत. त्याचा पूर्णत्वाने नाश करणे हे कर्तव्य आहे. आसनाधीस्त पूर्णत्वाने हे जाणीत आहेत, पण आपण मानवी तऱ्हेने नाराजी पत्करू नये. संदेशाप्रमाणे सर्वस्व कर्तव्य होत आहे. पूर्ण झाल्यानंतर, मग पहा. ©️

You cannot copy content of this page