Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

नामापरते अन्य साधन नाही…©️

नामापरते अन्य साधन नाही…©️

श्री समर्थ मालिक – दिसते ते नसते, अशी जर कल्पना असेल तर पुन:र्रपी जन्माला कोण येते? पाच तत्वांचा हा देह आहे. मग नसते काय अन् अमर राहते काय? हा दृश्य अदृश्याचा खेळ आहे. प्रकृती अंग नटवले तरी प्रकृतीला कोणत्यातरी निमित्ताने मी त्यागतो, पण कोणाच्या प्रेरणेने, याची गती प्रकृतीला मिळत नाही. भक्ती मार्गाने ज्योत गेली तर त्याला समजेल. पण बोल गेला, कृती झाली मग पश्चा:ताप युक्त होतो.

पण प्रथम काय? अमर कोण आहे हे गुह्य आहे. नाशिवंत जडत्व आहे. कधी दृश्य होते तर कधी अदृश्य होते. यात चेतना आहे. त्यांचा (सताचा) वास आहे. कोणीही मरत नाही. कोणाचाही नाश होत नाही. इतकेच की स्थूल देहाची जी अपेक्षा आहे ती दूर होणे कठीण आहे.

पुन:र्रपी जननम्, पुन:र्रपी मरणम् असे म्हटले आहे. पुढे काय होते? मी कोणत्या जन्माला येतो? मागच्या जन्मी मानव होतो की कोण होतो असे काही सांगता येत नाही, पण जाणे येणे हा सिद्धांत आहे. मग नाश काय होते? ८४ लक्ष योनी फिरावे लागते ते कोणाला? अन् नाही कोणाला, इतके तरी माहित आहे ना? मग नाश कोणाचा होतो?

म्हणून सेवेकर्‍यांनी अभ्यासू व्हावे. अभ्यासू होण्याचा प्रयत्न करावा. पूर्वजन्मीच्या संचितातून कधी मोकळे होता येईल याचा प्रयत्न करणे. त्यासाठी उपाय दिलेला आहे, तो म्हणजे नामस्मरण करणे. नामस्मरणाला पर्याय नाही. नामापरते साधन अन्य नाही. (समाप्त)©️

You cannot copy content of this page