Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

त्रिवेणी संगम – प्रेम, समता, बंधुभाव ©️

त्रिवेणी संगम – प्रेम, समता, बंधुभाव ©️

या दरबारात एक तरी सेवेकरी काम, क्रोधाची कुरवंडी केलेला, मायेचे मूळ उपटून टाकलेला आहे असे दिसत नाही. सेवेकऱ्याने आधी केले, नंतर सांगितले तेच तुम्ही वाचता, तेच तुम्ही कृतीत आणा. सेवेकऱ्यांजवळ अजून समतेचा पाझर नाही. अजून हेवे दावे गेलेले नाहीत. अजून एकमेकांची थट्टा मस्करी करणे गेलेली नाही.

मला सांगा, एकमेकांविषयी प्रेमळपणा किती आहे? सद्गुरुं बरोबरचे नाते प्रेमळपणाचे किती आहे? हे जर अखंड नाते आहे, तर आपण कसे राहिले पाहिजे? पहा, विचार करा ! आपणाला मी जे सांगतो आहे, हे गिरवत गिरवत लक्षात ठेवून, तसे तरी करा. मनाला येईल तसे करू नका, वागू नका. आसनाधिस्तांचे संदेश असतील तसे करा.

येथे सर्वांना सारखे अधिकार आहेत. हे मी मोघम बोलत आहे. समर्थांची इच्छा असतेच की आपला सेवेकरी अशा पात्रतेचा केव्हा होईल? तेव्हा, ज्याला पटेल, तोच या ठिकाणी झटेल. ज्याला न पटेल तो आपोआप फाटेल.

कृष्णावतारात अर्जुनाचे काहीतरी संचित असले पाहिजे. त्याचप्रमाणे दुर्योधनाचे देखील असले पाहिजे. दोघेही माझ्या सानिध्यात होते, मग अर्जुनालाच पाठीशी का घातले? त्याच्याकडून कर्तव्य करून घ्यावयाचे होते. भीष्म ही त्या तऱ्हेची ज्योत होती. त्याच्याच कृतीप्रमाणे त्याला फळ दिले. दुर्योधनाला त्याच्या कृतीप्रमाणे फळ दिले. या ठिकाणी प्रेम, समता, बंधुभाव असा त्रिवेणी संगम सेवेकऱ्यांच्या हृदयात असावयास पाहिजे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page