Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

ठेविले अनंते तैसेची रहावे। चित्ती असू द्यावे समाधान।। आपले सद्गुरु जे आपल्याला सांगत असतात त्याची छाननी करणे, उजळणी करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य …

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

अवतार कार्यांचे कार्य…©️

अवतार कार्यांचे कार्य…©️

पूर्वी जी काही अवतार कार्य घडली आहेत,त्यातील प्रगट अवतार कार्य दहा आहेत. परंतु खरी अवतार कार्य घडली पंचवीस! या २५ अवतार कार्यात अघोरांचा स्थूलाने नाश केलेला होता. तेच अघोर सूक्ष्माने परत बलवत्तर झाले. नाश कशाचा झाला तर स्थूल देहाचा म्हणजेच कवचाचा. परंतु सूक्ष्माने ते परत वावरू लागले. त्यांचीही तपश्चर्या बलाढ्य होती म्हणून स्थूल देहांवर ताबा मिळवून आपल्या पद्धतीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली.त्यामुळे अनंतांना काळजी निर्माण झाली की आता यावर मार्ग कोणता? यासाठी ॐकारांना संदेश देऊन अवतार कार्य नटविण्यास सांगितले. अवतारकार्यात महान महान अघोरांचा स्थूलाने नाश घडवून आणला. यामुळे स्थूल देहाचा कवचाचा नाश झाला. परंतु त्या अघोरांची बलाढ्य सूक्ष्म मात्र तशीच कार्यरत राहिली. त्यांनी शक्ती कमावली. आपण पाहतोच की आपल्यातून निघून गेलेल्या ज्योती आता सूक्ष्माने ध्यानधारणा करतातच. तशीच शक्ती या अघोरांच्या सूक्ष्माने देखील कमावली आणि सर्वांनाच त्रास देण्यास सुरुवात केली. संत, सज्जनांना त्रास होऊ लागला. भूमातेने देखील अनंतांची आळवणी केली की आता हा भार आम्हाला सहन होत नाही…©️

You cannot copy content of this page