Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – शरीर मन सोडून नाही आणि मन शरीर सोडून नाही. शरीराला त्रास झाला तर मनाला त्रास …

“तुरत दान महापुण्यम” नाही. पुढे ही ज्योत कुठे जाणार आहे याची सर्वस्वी नोंद त्यांच्याजवळ असते. सद्गुरूंना सर्वस्वाची कल्पना असते. अन हाच राजमार्ग …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपणाला माहित आहे कित्येक कोटी अघोरांचा नाश झाला. शुद्धीकरणात ज्योतींचे तुकडे करून नाश केला. त्या …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – ही भक्ती इतकी अत्यंत श्रेष्ठ आहे की त्याची योग्यता ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र, याबरोबर तुम्ही करू शकत …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपण पाहतोच की आपल्याकडे काही मानवांची शुद्धीकरण स्थिती होत असताना काही बलाढ्य तर काही महाबलाढ्य, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – भक्ती हा एक मोठा राजमार्ग आहे त्यात काटे कुटे, खाच खळगे काही नाही. परंतु तामसी …

मन स्थिर करणे…©️

मन स्थिर करणे…©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज –

अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व दिसणार नाही, पाहता येणार नाही. खरोखरच येथील सर्व सेवेकर्‍यांनी आपल्या सद्गुरुंकरीता मनामध्ये सदभावना, सतशुद्धपणा आणणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. सेवेकर्‍याच्या मनाची भावना सतशुद्ध असेल तर त्याचे क्रियाकर्म सत शुद्ध असावयास पाहिजे. परंतु आपले सेवेकरी कसे आहेत, ”वाटता जड भारी, मग आठवावा श्रीहरी.”

सद्गुरूंनी कर्तव्याकरता प्रणव दिले तर वेळ नसतो, परंतु सद्गुरूंनी जर असे सांगितले की ”आता मला वेळ नाही नंतर पाहू.” तर सेवेकऱ्यांची अवस्था काय होईल? परंतु सद्गुरु तत्त्व दयाघन आहे, त्यांना आपल्या सेवेकऱ्याकरीता माया आहे, ओढ आहे, आपुलकी आहे, ते त्याला प्रसंगातून मुक्त करतात. ते सदैव सेवेकऱ्यांना सांगत असतात, मनात सदभावना निर्माण कर. मन सद्गुरुमय बनविण्याचा प्रयत्न कर आणि एकदा मनाने ते आकारले की त्यांची भावना सदैव सतच राहणार! पण जर एखाद्या सेवेकऱ्याने स्वतःला यापासून वंचित केले, गैरकृत्ये केली, तर विचार करा तुम्हाला परत सद्गुरु सानिध्य कसे मिळेल?

मनाला आकार देणे, ही त्या सताची शक्ती आहे. तुम्हाला परत सानिध्यात पाठविणे ही देखील त्या अनंतांची, सताची, सद्गुरूंची शक्ती आहे. म्हणून सेवेकऱ्यांनो आपल्या सद्गुरुंबद्दल आपल्या मनात सदभावना जागृत ठेवा. मनाला परोपरीने सांगा की आपले सर्वस्व त्या अचलाप्रत ठेव तरच तुला पुढची गती प्राप्त होईल आणि एकदा गती मिळून सर्वस्व तुझ्यातच प्रगटले मग तुला कशाचीही ददात नाही. हे मना, तू त्यांची, सद्गुरूंची जाण घे, पूर्ण सतमय हो. सद्गुरुमय हो. माझ्या सद्गुरू शिवाय या त्रिभुनात वेगळे तत्त्व नाही. पण हे मन स्थिर करणे अत्यंत दुरापास्त गोष्ट आहे. एकच तत्व त्याला स्थिर करू शकते ते म्हणजेच सत किंवा सद्गुरु तत्त्व! पण हे कधी होईल ज्यावेळी सेवेकरी शारीरिक, मानसिक, संपूर्णपणे सताकरिता, सद्गुरुंकरीता ओथंबलेला असेल तेव्हाच ते होऊ शकेल. त्यावेळी त्याचे मन स्थिर होईल…©️

You cannot copy content of this page