Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – शरीर मन सोडून नाही आणि मन शरीर सोडून नाही. शरीराला त्रास झाला तर मनाला त्रास …

“तुरत दान महापुण्यम” नाही. पुढे ही ज्योत कुठे जाणार आहे याची सर्वस्वी नोंद त्यांच्याजवळ असते. सद्गुरूंना सर्वस्वाची कल्पना असते. अन हाच राजमार्ग …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपणाला माहित आहे कित्येक कोटी अघोरांचा नाश झाला. शुद्धीकरणात ज्योतींचे तुकडे करून नाश केला. त्या …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – ही भक्ती इतकी अत्यंत श्रेष्ठ आहे की त्याची योग्यता ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र, याबरोबर तुम्ही करू शकत …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपण पाहतोच की आपल्याकडे काही मानवांची शुद्धीकरण स्थिती होत असताना काही बलाढ्य तर काही महाबलाढ्य, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – भक्ती हा एक मोठा राजमार्ग आहे त्यात काटे कुटे, खाच खळगे काही नाही. परंतु तामसी …

हे मना…२ ©️

हे मना…२ ©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज –

प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना तू का बरे स्थिर होत नाहीस? मन म्हणते अरे मला तू असा प्रश्न करतोस, पण तुझी कृती कशी आहे याचा तू विचार केलास का? तुझी क्रिया, कृती, कर्तव्य कोणत्या तऱ्हेने चालू आहे याचा विचार तू केला आहेस का? आणि मग मलाच का बरे प्रश्न करतोस की सताच्या, सद्गुरूंच्या ठिकाणी मी का स्थिर होत नाही? तुझी क्रिया, कर्तव्य, कृती जर सद्भावनेने ओथंबलेली असेल तर मी का बरे तुझ्या सताच्या, सद्गुरूंच्या ठिकाणी स्थिर होणार नाही, का बरे माझ्या सद्भावना सद्गुरूंच्या ठिकाणी असणार नाहीत? म्हणूनच म्हटले आहे,

यद भावो । तद भवतू ।।

जसा भाव तसा सदभाव तशीच भावना, असद्भाव तशी भावना. आपली क्रिया कर्मे मायातीत असल्यामुळे आपण फक्त सदभावनेचे अवडंबर करतो. सद्गुरूंना असे दर्शविण्याचा आम्ही सतत प्रयत्न करतो. आम्ही सद्गुरूंच्या ठिकाणी ठाम आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न करतो. आपले सद्गुरु आपल्याला सांगतात, संसारात राहून संसाराची पूर्णत्व कर्तव्य कर. मुला माणसात आनंदाने रहा. समर्थ तुला सदैव देणारे आहेत. कोणतीही काळजी करू नकोस. पण एक लक्षात ठेव ही सर्वस्व माया आहे. ती नाशिवंत आहे. इतकेच काय तू जे कवच धारण केले आहेस ते देखील नाशिवंत आहे. परंतु तुझ्या आत वास करणारे जे अविनाशी आहे, ते मात्र लय होणारे नाहीत. मग तू हा का विचार करत नाहीस, का यामुळे स्वतःला गुरुफटवून घेतोस? ©️

You cannot copy content of this page